ZP उमेदवारीसाठी सरपंच-उपसरपंचांचा राजीनामा; राष्ट्रवादीवर निवडणुकीपूर्वीच दबाव

मागील ३० वर्षांच्या काळात केंदूरकरांना जिल्हा परिषदेसाठी कॉंग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीकडून डावलल्याची भावना आहे.
Suvarna Thitte, Bharat Sakore
Suvarna Thitte, Bharat SakoreSarkarnama
Published on
Updated on

शिक्रापूर (जि. पुणे) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत जिल्हा परिषदेची उमेदवारी गावाला मिळावी, यासाठी माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे यांच्या केंदूर (ता. शिरूर) गावचे सरपंच आणि उपसरपंचांनी राजीनामा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रेष्ठींवर दबाव वाढविला आहे. दरम्यान, यापूर्वी माजी सभापती सदाशिवराव थिटे हे १९९२ मध्ये जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते, त्यानंतर गावाला संधी मिळालेली नाही. आगामी निवडणुकीत गावाला संधी मिळावी, यासाठी सरपंच सुवर्णा थिटे-पाटील आणि उपसरपंच भरत साकोरे यांनी राजीनामा देत संपूर्ण गावाने राष्ट्रवादीवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे. (Kendur's Sarpanch, Deputy Sarpanch resigns for ZP candidature)

केंदूर हे गाव तसे शिरूर तालुक्याच्या राजकारणात कायमच केंद्रस्थानी राहिले आहे. कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून बापूसाहेब थिटे यांनी सन १९६७, १९७२, १९७९ या सलग तीन पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेत गाजविली. ते १९७९ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षही राहिले आहेत. त्यांच्या पश्चात त्यांच्याच भावकीतील सदाशिवराव थिटे हे १९९२ मध्ये जिल्हा परिषदेत पोचले. विशेष म्हणजे बापूसाहेब थिटे, सदाशिवराव थिटे हे शिरुर पंचायत समितीचे सभापती म्हणूनही काम पाहिले आहे. त्यानंतरच्या काळात मात्र केंदूरकरांना जिल्हा परिषदेत जाता आले नाही. मात्र, पंचायत समितीच्या माध्यमातून बापूसाहेब थिटे, सदाशिवराव थिटे यांनी सभापतिपद, तर केंदूरचेच राजेंद्र रासकर, विद्यमान सविता पऱ्हाड हे दोघे उपसभापतिपदापर्यंत पोचले. मात्र ३० वर्षांच्या काळात केंदूरकरांना जिल्हा परिषदेसाठी कॉंग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीकडून डावलल्याची भावना आहे.

Suvarna Thitte, Bharat Sakore
भुजबळांविरोधात याचिका करणारे आमदार कांदे पत्रकारांना पाहून पसार झाले!

पार्श्वभूमिवर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वेगवेगळ्या पॅनेलमधून विजयी झालेले सर्व १७ सदस्य एकत्रित येवून त्यांनी सरपंच-उपसरपंचपद बिनविरोध करुन राजकीय मतभेद बाजूला ठेवले. याच एकजुटीचा लाभ घ्यावा; म्हणून आता या सर्वांकडूनच गावाला आता जिल्हा परिषद निवडणुकीत संधी द्यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे. ही संधी राष्ट्रवादीकडून मिळावी, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह श्रेष्ठींपर्यंतही ही मागणी पोचवली आहे. उमेवारीसाठी सरपंच सुवर्णा थिटे यांच्यासह त्यांचे पती सतीश थिटे, माजी सरपंच विमल थिटे, त्यांचे चिरंजीव उद्योजक सनी थिटे, तसेच विद्यमान उपसभापती सविता पऱ्हाड व त्यांचे पती उद्योजक प्रमोद पऱ्हाड ही मंडळी इच्छुकांच्या आखाड्यात असल्याची चर्चा आहे

Suvarna Thitte, Bharat Sakore
छगन भुजबळ म्हणाले, `आमचं आम्ही पाहून घेऊ`

दरम्यान, पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटात सर्वाधिक सुमारे ९ हजार मतांचा गठ्ठा असलेले एकमेव गाव म्हणजे केंदूर आहे. मागील प्रत्येक निवडणूकीत गटातील आठ गावांपैकी केंदूरच्या मतदानावरच येथील निकाल ठरतो. मागील निवडणूकीत विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे या त्यांच्या पाबळ गावात पिछाडीवर राहिल्या, मात्र त्यांचे माहेर असलेल्या केंदूरमध्ये त्यांनी निर्णायक आघाडी घेऊन शिवसेनेच्या उमेदवार तथा माजी पुणे जिल्हा बॅंकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे यांचा पराभव केला होता. ही सर्व आकडेवारीही राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडे पाठवून उमेदवारीसाठी आत्तापासूनच दावा म्हणून सरपंच-उपसरपंच एकत्रित राजीनामा दिल्याची माहिती शिवसेनेचे शाखाप्रमुख भाऊसाहेब थिटे तसेच ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत थिटे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com