Mahesh Landge News : भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या राजकीय जीवनात ‘हा’ ठरला ‘टर्निंग पॉईंट’

Pimpri Chinchwad : ...तेव्हापासून ते देवेंद्र फडणवीसांच्या ‘गुडबॉक्स’मध्ये आहेत.
Mahesh Landge, Pimpri Chinchwad
Mahesh Landge, Pimpri ChinchwadSarkarnama

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात सध्यस्थितीला सर्वाधिक ‘वजनदार’नेता म्हणून ओळखले जाणारे भाजपचे शहराध्यक्ष आणि पक्षाचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची राजकीय कारकीर्द २०१४ पासून खऱ्या अर्थाने बहरली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते आणि माजी भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांचा अपक्ष उमेदवार म्हणून प्रचंड मोदी लाटेत २०१४ ला पराभव केला. तेव्हापासून ते देवेंद्र फडणवीसांच्या ‘गुडबॉक्स’मध्ये आहेत.

राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष असा राजकीय प्रवास सुरू करणारे महेशदादा यांना २००२ ला पहिल्यांदाच महापालिका पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. ही निवडणूक विलास लांडे यांच्याविरोधातील होती. त्यानंतर तब्बल २० वर्षे संघर्षमय वाटचाल करीत त्यांनी शहराच्या ‘आश्वासक लीडरशीप’पर्यंत प्रवास केला आहे.

Mahesh Landge, Pimpri Chinchwad
Old Pension Scheme News : जुन्या पेन्शन योजनेबाबत विधान परिषद निवडणुकीमुळे भाजपची भूमिका बदलली?

महापालिकेत सलग तीनदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर २००७ साली स्थायी समिती सभापतीपदासाठी दावेदार म्हणून महेश लांडगे यांचं नाव चर्चेत होते. मात्र, तत्कालीन सत्ताधारी पक्षश्रेष्ठींनी त्यांना डावलले.१२ वर्षे पक्षात झालेली ही घुसमट त्यांच्या समर्थकांमध्ये राजकीय इर्शा निर्माण करणारी ठरली. २००९ च्या विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीकडे तिकिटाची मागणी केली.

मात्र, राजकीय कुरघोडीच्या राजकारणात त्यांची संधी हुकली. त्यामुळे भोसरीच्या राजकारणात तत्कालीन आमदार विलास लांडे आणि महेश लांडगे (Mahesh Landge) असे दोन गट निर्माण झाले.

राष्ट्रवादीला लांडगे यांच्या नाराजीचा फटका बसणार हे लक्षात आल्यानंतर त्यांना २०१४ साली संधी स्थायी समिती सभापतीपदासाठी संधी देण्यात आली. त्यामुळे महेशदादांना राजकीय ताकद मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. आपल्या समर्थकांची विकासकामे मार्गी लावली. त्यामुळे लांडगे गटाचे वर्चस्व वाढले होते.

Mahesh Landge, Pimpri Chinchwad
ZP News: जिल्हा परिषदांतील रखडलेली पदभरती तत्काळ करा ; ग्रामविकास विभागाचे आदेश

२०१४ च्या विधानसभेला,मात्र क्षमता असतानाही राष्ट्रवादीकडून महेशदादांना तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे भाजप, शिवसेना, मनसे अशा सर्वच प्रमुख पक्षांकडे त्यांनी तिकीटाची मागणी केली. मात्र, एकानेही संधी दिली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार केला.‘अपक्ष’निवडणूक लढवत ‘नारळ’या चिन्हावर विजयश्री खेचून आणली. प्रमुख पक्षांनी तिकीट नाकारलेले उमेदवार प्रचंड मोदी लाटेत अपक्ष निवडून येवू शकतो, असा राजकीय चमत्कार पहायला मिळाला.

आ. लांडगे यांच्या राजकीय वाटचालीवर प्रकाश टाकला असता, २००२ साली पहिल्यांदा महापालिका निवडणुकीत झालेला पराभव, सलग तीनदा निवडून आल्यानंतरही तब्बल १२ वर्षे महत्त्वाच्या पदापासून वंचित राहणे आणि २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून डावलणे… असे त्यांचे ‘राजकीय टर्निंग पॉईंट‘दिसून येतात. त्यामुळे आज पिंपरी-चिंचवडची लीडरशीप करताना त्यांचा २० वर्षांचा राजकीय संघर्षमय प्रवास लक्षवेधी वाटतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com