Old Pension Scheme News : शासकीय कर्मचाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनावर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर पुन्हा एकाद जुन्या पेन्शन योजनेची चर्चा राज्यभरात सुरु झाली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) विधान परिषद निवडणुकीत हा मोठा मुद्दा केला आहे. त्यानंतर भाजपनेही आम्हीच पेन्शन योजना देऊन शकतो, असे सांगितले.
हिवाळी अधिवेशात जुनी पेन्शन योजना देणे शक्य नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर दोन दिवसापूर्वी नागपूरमध्ये बोलताना त्यांनी जुनी पेन्शन आम्हीच देऊ शकतो, असे सांगितले. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत जुन्या पेन्शन योजने संदर्भात भाजने भूमिका बदलली, असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरु झाली आहे.
२००५ मध्ये पेन्शन योजना बंद झाली. राज्याचे हित लक्षात घेऊन जुनी पेन्शन योजना रद्द करण्यात आली आहे. या पेन्शन योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर एक लाख १० हजार कोटींचा बोझा पडतो. यातून राज्य दिवाळखोरीत निघेल, असे फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते.
मात्र, त्यानंतर दोन दिसांपूर्वी नागपूरमध्ये झालेल्या सभेत फडणवीस म्हणाले, 'जुनी पेन्शन योजना आम्हीच देऊ शकतो. जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निर्माण केला आहे. मात्र, तो सोडवण्याची धमक आमच्यात आहे.
नागपुरात शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी भाजपची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले होते की, कायम विना अनुदानित शाळांचा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निर्माण केला होता. आम्ही आश्वासन दिले नव्हते. मात्र, आम्ही ते काम करून दाखवले, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.
'येत्या काळात आपण अनुदानाचे सगळे ठरलेले टप्पे पूर्ण करणार आहेत. मागील सरकारने शिक्षकांच्या बाजूने कुठलेही निर्णय घेतले नाही, असा आरोपही त्यांनी केला होता. आम्ही शिक्षक भरती सुरू केली आहे. काही लोकांनी अफवा उडविल्या की, पट संख्या कमी असलेल्या शाळा बंद होणार. मात्र, आम्ही शाळा बंद करणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली होती.
तसेच जुन्या पेन्शन योजेनवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले होते, 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मला लाज वाटते. ते जणू दाखवतात की जुनी योजना भाजपने बंद केली. मात्र, तसे नाही आहे. पेन्शन खर्च वाढणार असल्याने विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे असे मी सांगितले होते'. 'काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठरविले. मात्र, दिले नाही. जुन्या पेन्शनचा वाद असो की कुठलाही तो प्रश्न सोडविण्याची ताकत फक्त आपल्यात आहे, असा दावा फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे भाजपची भूमिका बदलली का? अशी चर्चा सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.