Maratha Kranti Morcha : ....म्हणून पिंपरी-चिंचवडमधील मराठा आमदार, खासदारांना लाज वाटली पाहिजे - मराठा क्रांती मोर्चा

Pimpri Chinchwad News : पिंपरीतही मराठा मोर्चाने चक्री उपोषण सुरू केले असून, त्याला आज सहा दिवस झाले आहेत.
Maratha Kranti Morcha
Maratha Kranti MorchaSarkarnama
Published on
Updated on

Maratha Morcha Pimpri-Chinchwad News : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. त्यात आता दोन खासदार आणि आमदारांनी राजीनामा देत साथ दिल्याने आंदोलनाला अधिकच धार चढली आहे.

मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये या आघाडीवर अद्याप शांतताच आहे. तेथील आमदार, खासदारांनी याप्रश्नी तुलनेत तेवढी आक्रमक भूमिका घेतली नसल्याने सकल मराठा क्रांती मोर्चा संतापला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha Kranti Morcha
Beed News : मराठा आरक्षणासाठी अजित पवार गटाच्या बीड जिल्हाध्यक्षांसह परळी विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा!

उद्योगनगरीतील आमदार, खासदारांना मराठा म्हणवून घेण्यास लाज वाटली पाहिजे, असा संताप मराठा आरक्षणासाठी पिंपरी चौकात साखळी उपोषणाला बसलेले मराठा मोर्चाचे सतीश काळे यांनी आंदोलनाच्या सहाव्या दिवशी व्यक्त केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या जिवाची बाजी लावलेले मनोज जरांगे-पाटील हे ज्या दिवशी (ता.२५)अंतरवाली सराटीत आमरण उपोषणास बसले, त्या दिवसापासून पिंपरीतही मराठा मोर्चाने चक्री उपोषण सुरू केले आहे. त्याला आज सहा दिवस झाले. पण, शहरातील चार आमदार आणि दोन खासदार यापैकी कोणीही इकडे फिरकले नाही, असे काळे यांनी सांगितले.

खरं, तर शिवसेना शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणावरून आपल्या पदाचा राजीनामा दिला, तसा तो पिंपरी-चिंचवडमधील मराठा आमदार, खासदारांनीही द्यायला हवा होता, किमान तशी तयारी दाखवायला पाहिजे होती, असे ते 'सरकारनामा'ला बोलताना म्हणाले.

उलट पिंपरी राखीव या मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी जरांगेंनी टोकाची भूमिका घेतली, असे वक्तव्य काल केल्याने वेदना झाल्या नाहीत, तर त्याचा संताप आला, असे काळे म्हणाले.

Maratha Kranti Morcha
Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हिंसक वळण; माजलगाव नगर परिषद पेटवली

शहरात भोसरी आणि चिंचवडमध्ये भाजपचे (महेश लांडगे आणि अश्विनी जगताप), तर पिंपरीत बनसोडे आमदार आहेत. उमा खापरे या विधान परिषद सदस्याही पिंपरी-चिंचवडकर आहेत. तर शिवसेना (शिंदे गट) श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे हे शहराचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आहेत.

या सर्वांचा मराठा आरक्षण मागणीला पाठिंबा आहे, पण राज्यातील काही आमदार, खासदारांसारखी त्यांनी आक्रमक भूमिका आणि राजीनाम्याचा पवित्रा न घेतल्याने मराठा मोर्चा आक्रमक झाला आहे. त्यासाठी शहरातील या आमदार, खासदारांच्या कार्यालये आणि घरांसमोर लवकरच आंदोलन केले जाणार आहेत. त्यापूर्वी उद्या सरकारचा दशक्रियाविधी पवना नदीकाठी चिंचवड येथे केला जाणार आहे.

(Edited By - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com