Beed News : मराठा आरक्षणासाठी अजित पवार गटाच्या बीड जिल्हाध्यक्षांसह परळी विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा!

Ajit Pawar Group : राजीनामापत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना पाठवून, या दोघांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला.
NCP Ajit Pawar Group Beed
NCP Ajit Pawar Group BeedSarkarnama

Maratha Reservation : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलाना तीव्र रूप येत आहे. जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार घडत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण व पक्षाचे परळी विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख या दोघांनी आपल्या पदाचे राजीनामे देत साखळी उपोषणात सहभाग घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

NCP Ajit Pawar Group Beed
Manoj Jarange Indefinite Hunger Strike: सरकारला आणखी किती वेळ द्यायचा ? जरांगेचा राधाकृष्ण विखे पाटलांना सवाल

राजीनाम्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पाठविले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून सर्कलनिहाय साखळी उपोषण सुरू आहेत. यात विविध गावांतील समाज बांधव सहभाग घेत आहेत. मात्र, मागील दोन दिवसांपासून आंदोलनादरम्यान हिंसक घटनाही घडत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आग, दगडफेकीच्या प्रकारही घडले.

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल हिनवणी करणाऱ्या वक्तव्याची कथीत ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने शेकडोंच्या जमावानेे त्यांच्या बंगल्यावर दगडफेक करून सर्व काचा फोडत बंगल्यातील वाहनांनाही आग लावली.

NCP Ajit Pawar Group Beed
Maratha Agitation : मराठा आरक्षणासाठी धनगर समाजाच्या सरपंचाने दिला राजीनामा; OBC बांधवांनीही केले मुंडन!

याच दरम्यान पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राजेश्वर चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या समवेत परळी विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख यांनीही राजीनामा दिला. या दोघांनी घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथे सुरूअसलेल्या साखळी उपोषणात सहभाग घेतला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

NCP Ajit Pawar Group Beed
Maratha Reservation News : कोल्हापूर जिल्ह्यातील 6 आमदारांची मराठा आरक्षण लढ्यात उडी; घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com