PCMC News : पालिका आयुक्त भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागतात; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

PCMC Administrator : पिंपरी महापालिकेतील 'जॅकवेल' प्रकरण उच्च न्यायालयात; २ मे रोजी सुनावणी
PCMC
PCMCSarkarnama

Pimpri-Chinchwad NCP : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे तीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप झालेली जॅकवेल बांधणी निविदा रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. मात्र, ती धुडकावून आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ती मंजूर केले. या जॅकवेलचे काम वादग्रस्त गोंडावाना कंपनीला दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. शेखर सिंह हे आयुक्त म्हणून नव्हे तर भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागत आहेत. भाजप नेत्यांच्या दबावाखाली चुकीच्या कामांना आणि भ्रष्टाचाराला ते चालना देतात, असा हल्लाबोल राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला.

PCMC
Ajit Pawar News : वर्षानुवर्षे प्रलंबित 'या' मुद्द्यावर अजित पवारांचं राज्य सरकारला पत्र; कारण काय?

Pimpri-Chinchwad शहरातील पाणीटंचाईचा गैरफायदा घेत भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने काळ्या यादीतील गोंडावाना कंपनीला ‘जॅकवेल’चे काम दिल्याचा आरोप यापूर्वीही अजित गव्हाणे यांनी केला होता. त्यामुळे आता काढलेली निविदा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, ती आयुक्तांनी फेटाळून लावली. त्यामुळे त्यांनी त्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर २ मे रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती गव्हाणे यांनी गुरुवारी (ता. २७) दिली.

दरम्यान, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि त्यानंतर आता त्यांच्या पत्नी आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनीही या जॅकवेल निविदेत गैरव्यवहार झाल्याची लेखी तक्रार केली होती. तसेच काढलेली निविदा रद्द करण्याची मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली होती.

PCMC
Ramdas Athawale News : भाजपमध्ये आले तरी अजितदादांना लगेच मुख्यमंत्रीपदाची संधी नाही....

याबाबत अजित गव्हाणे (Ajit Gavhane) म्हणाले, "गोंडावाना इंजिनिअरिंग कंपनीने अटी, शर्तीनुसार कागदपत्रे सादर केलेली नाहीत. काळ्या यादीत असल्याची बाबही त्यांनी लपविली. निकृष्ट दर्जाची कामे केल्याचे शेरे या कंपनीवर आहेत. १२० कोटी रुपयांचे जॅकवेलचे काम या कंपनीला १४७ कोटी रुपयांना देण्यात आले. देखभाल दुरुस्तीसाठी २३ कोटी रुपयांचा खर्च निश्चित केला असतानाही त्यासाठी २८ कोटीच्या खर्चाला मान्यता दिली. या अनागोंदी प्रकरणी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्याद्वारे शहरातील जनतेला न्याय मिळेल आणि भाजपचा आणि आयुक्तांचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर उघडा होईल."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com