Nagpur Winter Session : मावळातील आमदार अण्णा गरजले, तर पिंपरीचे अण्णा शांतच !

Political News : यावेळीही अधिवेशनात पिंपरीचे आमदार बनसोडेंची पाटी कोरी, विधानसभेत बोललेच नाही.
Anna bnsode, Ashvini Jagtap, Sunil shelke, Mahesh Landge
Anna bnsode, Ashvini Jagtap, Sunil shelke, Mahesh LandgeSarkarnama
Published on
Updated on

Winter Session : राज्य विधीमंडळाच्या दहा दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाचे बुधवारी (ता.२१) सूप वाजले. त्यात पिंपरी-चिंचवडमधील चारपैकी भाजपचे महेश लांडगे (भोसरी),अश्विनी जगताप (चिंचवड) आणि उमा खापरे (विधान परिषद) या तीन आमदारांनी ते गाजवले. तर,पिंपरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार)अण्णा बनसोडे हे,मात्र त्याला अपवाद ठरले. मागील अधिवेशनांसारखे यावेळीही त्यांचे मौन दिसले. दुसरीकडे दुसरे आमदार अण्णा मावळचे सुनील शेळके हे, तर अधिवेशनात गरजले.

दहा महिन्यांपूर्वी पोटनिवडणुकीत गृहिणी ते थेट पहिल्यांदा आमदार झालेल्या अश्विनी जगताप शांत महिला आमदारांची नागपूर अधिवेशनात,तर दमदार कामगिरी झाली. त्या पार्श्वभूमीवर दोन टर्म आमदार असलेल्या बनसोडेंचे मौन चर्चेचे विषय ठरले. औचित्याचा मुद्दा, ताराकिंत प्रश्न लक्षवेधीसारख्या आयुधांचा जगताप, लांडगे, खापरे यांनी खुबीने वापर केला. त्यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना आपल्या मतदारसंघातील प्रश्न पुन्हा मांडले. तर, यापैकी एकाचीही मदत बनसोडेंनी घेतली नाही.

Anna bnsode, Ashvini Jagtap, Sunil shelke, Mahesh Landge
Parliament Winter Session : पंतप्रधान लोकसभेत आले, बसले, उभे राहिले आणि गेले!

जगताप या २ मार्चला निवडून आल्या.त्यानंतर दोन आठवड्यांतच त्याच महिन्यात झालेल्या राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात त्यांनी अनुदानावरील चर्चेत भाग घेतला. कामाची त्यांची ही चुणूक नंतरच्या पावसाळी अधिवेशनातही दिसली. काल संस्थगित झालेल्या हिवाळी अधिवेशनात,तर त्यांनी जोरदार बॅटिंग केली.त्यांच्या लक्षवेधीमुळे पुनावळे येथे कचरा डेपो करण्याच्या पिंपरी महापालिकेच्या हालचालींना ब्रेक लागला.कारण तो रद्द करण्याची घोषणा सरकारला सभागृहात करावी लागली.मराठा आरक्षणावर मुद्देसूदपणे त्या बोलल्या. मतदारसंघातील रखडलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा प्रश्न उपस्थित केला.

उद्योगनगरीतील भाजपच्या दुसऱ्या महिला आमदार खापरे यांनीही यावेळचे अधिवेशन गाजवले.अधिवेशन काळात शहरात झालेल्या अग्निकांडाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यावर अर्ध्या तासाची चर्चा घडवून आणली.शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या वाढत्या प्रदूषणावरील लक्षवेधीवर,तर त्या मंत्र्यांवर बरसल्या.आपल्या सरकारला घरचा आहेर दिला. लांडगे यांचा आक्रमकपणा यावेळीही कायम राहिला.

मतदारसंघासह शहरातील प्रश्नही त्यांनी हिरीरीने मांडले. शहरात बर्न वॉर्ड उभारण्याची मागणी केली. त्यानंतर पिंपरी महापालिकेने त्यासाठी आता हालचाली सुरु केल्या आहेत.नद्यांच्या झालेल्या गटारगंगांवर आणि मराठा आरक्षण देण्यावर ते पोटतिडकीने बोलले.कित्येक वर्षानंतरही महापालिकेकडून आरक्षित जागांच्या भूसंपादनाअभावी रखडलेल्या रस्त्यांची समस्या त्यांनी मांडली. दुसरीकडे शेळकेनी देशातील सर्वात मोठा काचेचा स्कायवॉय हा ३३३ कोटी रुपयांच्या मतदारसंघातील (लोणावळा) प्रकल्पाला मंजुरी मिळवून आणली. मोदींच्या जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचार समोर आणला. त्याची चौकशी लावली.

अण्णा बनसोडे विधिमंडळात गप्पच

शहरातील तीन आमदारांच्या जोडीने सुनील शेळके (Sunil Shelke )हे कामाची छाप सभागृहात सोडत असताना,बोलत असताना बनसोडे,मात्र गप्पच होते.त्यांची एकही लक्षवेधी आली नाही, एकही प्रश्न लागला नाही वा मराठा आऱक्षण, शहरातील जळितकांडांसह कुठल्याही चर्चेत ते सहभागी झाले नाहीत.औचित्याचा मुद्दा उपस्थित केला नाही. अनुदानावरील चर्चेतही ते बोलले नाहीत, तर मागील अधिवेशनात सुद्धा ते गप्पच होते. ते सभागृहात बोलतच नाहीत. लोकांच्या समस्या थेट सोडविण्यावर आपला भर असतो, असे यासंदर्भात अण्णा बनसोडेंनी (Anna Bansode) सांगितले.

Anna bnsode, Ashvini Jagtap, Sunil shelke, Mahesh Landge
Pimpri News : आमदार शेळकेंनी दाखविला 'मार्ग' ; थेट 'पीआय'ना धरले धारेवर..!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com