PCMC News: ना कुणी वेळेवर येतंय, ना कुणी गणवेश वापरतंय; प्रशासकीय राजवटीत पालिका अधिकारी, कर्मचारी मोकाट

Pimpri-Chinchwad: कर्मचाऱ्यांबद्दल पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या
PCMC
PCMCSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवटीस या महिन्याच्या १४ तारखेला एक वर्षे पूर्ण होत आहे. या काळात नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. त्यामुळे पालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचारी हे बेशिस्त झाल्याचे दिसून येत आहे. अधिकारी, कर्मचारी कार्यालयात वेळेत येत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

अनेक महापालिका (PCMC) अधिकारी व कर्मचाऱ्याच्या सकाळी दहा वाजेपर्यंत हजेरीपत्रकावर सह्याच नसल्याचे अचानक करण्यात आलेल्या तपासणीत आढळून आले. तसेच काही अधिकारी व कर्मचारी हे विनागणवेशही दिसून आले. विभागप्रमुखांचे नियंत्रण नसल्याने त्यांच्या हाताखालील अधिकारी व कर्मचारी हे बेशिस्त झाल्याचे दिसून येत आहेत. ते वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

PCMC
Pune By Election: धंगेकर, जगतापांनी आधी मानले मतदारांचे आभार, मग घेतली आमदारकीची शपथ

फिल्डवरून आल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी हे फिरती रजिस्टरमध्ये सही करीत नाही, आल्याची वेळही नोंदवित नसल्याचा गंभीर प्रकार या तपासणीतून समोर आले. त्यामुळे हजेरीपत्रकाची तसेच फिरती रजिस्टारची सुद्धा दररोज तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचा फतवा अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आज विभागप्रमुखांसाठी काढला. कार्यालयीन शिस्तीचा भंग (वेळेत न येणे, विनासही फिरतीवर जाणे व आल्य़ावर सही न करणे, गणवेश न घालणे) करणाऱ्यांविरुद्धच्या कारवाईचा अहवाल या महिनाअखेर सादर करण्यासही त्यांना सांगण्यात आले आहे.

असा फतवा दोन महिन्यांत दुसऱ्यांदा काढण्याची पाळी आली आहे. दोन महिन्यांपूर्वी केलेल्या हजेरीच्या रॅंडम तपासणीतही वरीलप्रकारे त्रूटी आढळल्या होत्या. त्यावेळीही असाच फतवा काढण्यात येऊन विभागप्रमुखांविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही ना अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लागली ना त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या विभागप्रमुखांवर कारवाई झाली. परिणामी दोन महिन्यांतच दुसऱ्यांदा असा कारवाईचा फतवा काढण्याचे नाटक प्रशासनाला करावे लागले आहे.

PCMC
Raj Thackeray : आपण सत्तेपासून दूर नाही, लवकरच सत्तेत असणार; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास

नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर सुरु झालेल्या पालिका आयुक्त तथा प्रशासकांच्या राजवटीत सुरवातीला राजेश पाटील आयुक्त असेपर्यंत पालिकेत शिस्त होती. कारण त्यांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांत त्यांचा वचक होता. मात्र, त्यांच्या बदलीनंतर पालिकेत बेशिस्तपणा सुरू झाला आहे. त्यामुळेच गेल्या दोन महिन्यांत दोनदा फतवे काढण्याची पाळी प्रशासक तथा प्रशासनावर आली आहे. आता या फतव्यानंतर काय होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com