पिंपरी स्थायीचे सर्व सदस्य धास्तावले ; एसीबीने बोलावण पाठवलं

पिंपरी पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सर्व स्थायी समिती (Standing Committee) सदस्यांवर ही नामुष्कीची पाळी आली आहे.
Pimpri Municipal Corporation
Pimpri Municipal Corporationsarkarnama

पिंपरी : भाजप सत्ताधारी पिंपरी चिंचवड महापालिकेत (Pimpri Municipal Corporation) उघडकीस आलेल्या टक्केवारी तथा लाचखोरी प्रकरणात आता स्थायी समितीच्या इतर सर्व १५ सदस्यांची चौकशी एसीबी म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करणार आहे. त्यासाठी एसीबीने समजपत्र नुकतेच (ता. २०) त्यांना बजावले. त्यामुळे भाजपच नाही, तर विरोधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गोटातही खळबळ उडाली आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सर्व स्थायी समिती (Standing Committee) सदस्यांवर ही नामुष्कीची पाळी आली आहे.

प्रत्येक सदस्यांच्या नावे त्यांच्या राहत्या घराच्या पत्यावर हे समजपत्र तथा चौकशीची नोटीस देण्यात आली आहे. त्यात एसीबीच्या पुणे कार्यालयात २१ते २९ सप्टेंबरपर्यंत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत नोटीसीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून या, असे बजावण्यात आले आहे. आम्ही नऊ सदस्य बहूदा एकत्रित जाऊ, असे भाजपच्या एका सदस्यांने 'सरकारनामा'ला सांगितले.

Pimpri Municipal Corporation
सहकारी संस्थांना दिलासा ; मंत्रीमंडळाने घेतला महत्वाचा निर्णय

या स्थायी समितीचा या प्रकरणाशी सबंध नाही. या टेंडर फाईली अगोदरच्या स्थायीच्या काळातील आहेत, असे सांगत त्यांनी अगोदरच्या स्थायीकडे (भाजपचीच) बोट दाखवले.  विद्यमान सभापतींचा या लाचखोरीशी सबंध नसल्याचे सांगत याबाबतही त्यांनी प्रशासन आणि सिस्टीम तथा स्थायीतील परंपरागत अनिष्ट टक्केवारीकडे अंगुलीनिर्देश केला. शहराध्यक्ष सांगतील त्या दिवशी आम्ही चौकशीला जाऊ, असे राष्ट्रवादीच्या स्थायीतील चारपैकी एक सदस्य म्हणाला. दरम्यान, या चौकशीनंतर आरोपींची संख्या वाढू शकते का? १५ पैकी कुणाला साक्षीदार करणार का? या प्रश्नांवर तो चौकशीचा भाग असल्याचे सांगत आता लगेचच त्यावर बोलणं उचित ठरणार नाही, असे या गुन्ह्याच्या तपासाधिकारी आणि एसीबीच्या डीवायएसपी सीमा मेंहदळे यांनी सरकारनामाला सांगितले

गेल्या महिन्यात १८  तारखेला पिंपरी महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा स्थायीच्या कार्यालयावर एसीबीची धाड पडली.त्यावेळी पालिका ठेकेदाराकडून एक लाख १८ हजार रुपये लाच घेताना स्थायी समिती सभापती तथा अध्यक्ष अँड नितीन लांडगे आणि त्यांच्या पीएसह स्थायीचे चार कर्मचारी पकडले गेले होते. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली.एकूण मंजूर टेंडर रकमेच्या तीन टक्के लाच मागून दोन टक्के घेण्यात आली होती.त्यानंतर लांडगेंना षडयंत्र रचून बळीचा बकरा केल्याचा दावा भाजप,त्यांचे पदाधिकारी आणि दोन्ही कारभारी आमदारांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com