वडगाव शेरी : लॉकडाऊनमध्ये शासनाने सर्वांचा विचार केला. परंतु ज्यांना रोज दारू पिण्याची सवय आहे त्यांचा विचार केलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये किमान रोज दोन तास दारू दुकाने उघडी ठेवा, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांकडे थेट मागणी करणारा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ विश्रांतवाडीतील किरण कांबळे उर्फ (के. के.) असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने बनवला आहे.
`केके`ने जरी व्हिडिओत त्याची मागणी मांडली असली तरी त्यात विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारू महागाईने विकत घ्यावी लागत असल्याची तक्रार त्याने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली. लॉकडाऊन काळातही काळ्या बाजारात अवैध दारू विक्री तिप्पट दाम देऊन जोमात सुरू असल्याचे स्पष्ट संगीतले आहे. के. के. चा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांचे धाबे दणाणले. केकेने केलेला भांडाफोड खरा की खोटा तपासण्याच्या सूचना मिळाल्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी केकेला ताब्यात घेतले व चौकशी केली. अवैध दारू विक्रीची अड्डे दाखवण्यासाठी त्याला सोबत घेतले. तीन चार ठिकाणी त्याला नेलेही. परंतु तळीरामांना सहजपणे भेटणारा माल पोलिसांना आढळून आली नाही.
`केके`ने व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार सध्या विश्रांतवाडी भागात दीडशे रुपयाची बाटली (कोर्टर ) चारशे रुपयांना विकण्यात येत आहे. तर धानोरी, लोहगाव परिसरात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याविषयीची माहिती आणि तक्रार या भागातील लोकप्रतिनिधींनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे केली आहे. तसेच काळायबाजारात अवैध दारू विक्री कशी सुरू आहे याचे कॉल रेकॉर्डिंग असलेला पुरावाही पोलिसांना दिला आहे.
याविषयी विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण आव्हाड म्हणाले, किरण कांबळे ने दिलेल्या माहितीची शहानिशा केली. परंतु त्यात तथ्य आढळले नाही. तीन ठिकाणी तपास केला परंतु दारूचा साठा आढळला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.