शिवसेना-भाजप म्हणजे दोन भावांतील भांडण ; चंद्रकांतदादांनी दिले युतीचे संकेत

आमचे हे दोन भावांतील भांडण असून पुन्हा सबंध निर्माण करावे लागतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
Chandrakant Patil
Published on
Updated on

पिंपरी : युती तुटल्यानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरेंविरुद्ध भाजप (BJP) व त्यातही त्यांचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे खूप आक्रमक विधानं आतापर्यंत करीत होते. पण पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बुधवारी (ता. ५) केलेल्या वक्तव्याने त्याला प्रथमच छेद दिला. कारण त्यांनी पुन्हा शिवसेनेबरोबरच्या (Shiv Sena) युतीचे स्पष्ट संकेत दिले.

''आमचे हे दोन भावांतील भांडण असून पुन्हा सबंध निर्माण करावे लागतात,'' असे ते म्हणाले, ''राजकारणात कॉँक्रीट असं काही नसतं. शेवटच्या क्षणी तेथे काहीही होऊ शकते,'' असे सूचक विधान त्यांनी केलं.

भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांची उद्धघाटन आणि भूमीपूजने केल्यानंतर पाटील बोलत होते. शिवसेनेला खऱ्या हिंदुत्वाकडे यावेच लागेल, असे सांगत त्यांनी शिवसेनेबरोबरच्या पुन्हा युतीचे स्पष्ट संकेत दिले.

''शिवसेना आणि भाजपमधील तुटलेला पूल केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी हे पुन्हा बांधू शकतात, असे वक्तव्य महाविकास आघाडी सरकारमधील स्पष्टवक्ते मंत्री अब्दूल सत्तार यांनी मंगळवारी (ता. ४) केलं होतं. त्यावर बोलताना पाटील यांनी पुन्हा युतीचे सूचक विधान केलं. राजकारणात शक्यता एका क्षणात निर्माण होऊ शकते. कारण तेथे कॉंक्रीट असं काही नसतं, असं ते म्हणाले. तसंच यानिमित्ताने शिवसेनेतील अस्वस्थता हळूहळू बाहेर पडायला लागली आहे, हे बरं झालं. काही खासगीत बोलतात, काही ओपन बोलतात,'' असे चंद्रकांतदादा म्हणाले.

''सत्तार जाहीर बोलले, कुठे रामदास कदम बोलले, कुठे तानाजी सावंत बोलले. याच्यापेक्षा खऱ्या शिवसैनिकाला शिवसेना आणि उद्धवजी बांधू शकत नाही. त्यांना खऱ्या हिंदुत्वाकडे जावे लागेल,'' असे पाटील म्हणाले.

<div class="paragraphs"><p><a href="https://www.sarkarnama.in/topic/chandrakant-patil">Chandrakant Patil</a></p></div>
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेसची मोठी घोषणा

''सर्वसामान्यांची इच्छा आहे की ही दोन भावांतील (शिवसेना आणि भाजप) भांडणं झालीत. ती संपवून पुन्हा सबंध निर्माण करावे लागतात. पण, असं कुठं आम्ही म्हटलं की लगेच सामनात अग्रलेख येतो की यांना सत्ता नसल्यामुळे झोप लागत नाही. पण,आम्हाला खूप शांत झोप लागते. उठवावे लागतं,'' असं ते म्हणताच हशा पिकला.

सांगलीत कोरोना नाही का, पुणे जिल्ह्यातून होतेय विचारणा

पिंपरी : गेले काही वर्षे बंद असलेली राज्यातील बैलगाडा शर्यत (Bullock cart race) पुन्हा तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यास सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्याच्या १६ तारखेला दिली. त्यानंतर पुणे (Pune) जिल्ह्यात पहिल्या बैलगाडा शर्यतीचा धुरळा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच (ता. १) उडणार होता. शिरूरचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील हे आपल्या गावी (लांडेवाडी,ता. आंबेगाव), तर मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके हे मावळ तालुक्यात नाणोली येथे राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या उपस्थित ही शर्यत घेणार होते. मात्र, शेवटच्या क्षणी ३१ डिसेबरच्या रात्री या शर्यतीला अगोदर दिलेली परवानगी काही तास अगोदर वाढत्या कोरोनाचे कारण देत स्थगित केली गेली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com