Sharad Pawar News : ठाकरेंशी युती; आता राष्ट्रवादी अन् वंचितचे एक पाऊल पुढे...

Ncp, Vanchit Bahujan Aghadi News : 2024 च्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत वंचित असेल का?
Sharad Pawar, Prakash Ambedkar News
Sharad Pawar, Prakash Ambedkar NewsSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar, Prakash Ambedkar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची नुकतीच मुंबईत भेट झाली होती. त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली, हे पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते.

प्रकाश आंबेडर यांच्याशी झालेल्या भेटीसंदर्भात पवार म्हणाले, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. तेथे राष्ट्रावादी काँग्रेस (NCP) आणि प्रकाश आंबेडकरांनीही काही उमेदवार उभे केले आहेत. ते आणि आम्ही लढणाऱ्या जागा वेगवेळ्या असतील तर सहकार्य करता येईल का? याबाबत चर्चा झाली.

Sharad Pawar, Prakash Ambedkar News
Pune Bazar Samiti Election: विकास दांगट-पाटलांची हाकालपट्टी देवदत्त निकमांचे काय? राष्ट्रवादी काय भूमिका घेणार?

प्रकाश आंबेडकर त्यांच्या उमेदवारांच्या याद्या माझ्याकडे पाठवणार आहेत. आमच्या उमेदवारांची यादी त्यांना देण्यात येईल, यानंतर आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ, असेही पवार म्हणाले. 2024 च्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत वंचित असेल का? असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, सध्या फक्त आमची कर्नाटकसंदर्भात चर्चा झाली आहे.

कर्नाटकच्या (Karnatak) निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि बंचितचे एक पाऊल पुढे पडले, असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातही महाविकास आघाडीमध्ये वंचित सहभागी होऊ शकते, अशी चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली आहे. मात्र, वंचित महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालेली नाही.

Sharad Pawar, Prakash Ambedkar News
Arvind Kejriwal House Renovation: केजरीवालांच्या बंगल्याची बातच न्यारी! एक कोटींचे मार्बल अन् एक पडदा आठ लाखांचा

कर्नाटक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही येथे उमेदवार दिले आहेत. कर्नाटकच्या निवडणुकीसाठी 10 मेला मतदान आहे. १३ मेला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत वंचित आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेकांच्या उमेदवारांना मदत करण्याची चर्चा झाली आहे. आंबेडकर-पवार भेटीमुळे महाराष्ट्रातही नवीन समिकरण जुळू शकतात, असे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com