Maharashtra Police Promotions: प्रतीक्षा संपली! १४३ पीआय झाले एसीपी, 'रिटायरमेंट'च्या उंबरठ्यावर अनेकांना 'प्रमोशन'ची लॉटरी

143 PI became ACP : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पाच पीआय हे एसीपी झाले आहेत.
Police
Policesarkarnama

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : राज्यातील राजकीय पेचप्रसंगावर सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालानंतर राज्य सरकारवरील टांगती तलवार दूर झाली आहे. त्यामुळे रखडलेले निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातीलच एक हा पीआय प्रमोशनचा होता. तो तब्बल तीन वर्षे रखडला होता. त्यामुळे ते मिळेल,ही आशा रिटायरला आलेल्या काही पीआयनी सोडूनच दिली होती. त्यांना हा सुखद धक्का सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून काहीसे स्थिर झालेल्या राज्य सरकारने दिला आहे.

राज्यात वर्षभरापूर्वी झालेला सत्ताबदल आणि त्यानंतर न्यायालयीन कचाट्यात सापडल्यामुळे लाभलेले अस्थिर सरकार याचा मोठा फटका राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीला बसल्याचे आढळले आहे. तीन वर्षापूर्वीच या बढतीला पात्र असलेल्या या अधिकाऱ्यांना काल सहाय्यक आयुक्त तथा पोलीस उपअधिक्षक म्हणून प्रमोशन मिळाले.

Police
Manish Sisodia News: मनीष सिसोदियांची कॉलर पकडूनच पोलिसांनी न्यायालयात नेलं; केजरीवालांकडून संताप व्यक्त

पिंपरी-चिंचवड(Pimpri chinchwad)मधील पाच पोलीस अधिकाऱ्यांना ही बढती मिळाली आहेत. त्यातील रावसाहेब जाधव हे,तर आठवड्यानंतर या महिनाअखेर निवृत्त होणार होते. तीन विभागांचा पदभार ते सध्या सांभाळत होते. उशिरा का होईना गूड न्यूज मिळताच त्यांनी `सरकारनामा`शी बोलताना आनंद व्यक्त केला. तर,पाच महिने रिटायरला राहिलेल्या शहरातील दुसऱ्या पीआयला सुद्धा ही बढती मिळाल्याने त्यांनीही समाधान व्यक्त केले. योगायोगाची बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाचे जनसंपर्क अधिकारी (पीआऱओ) म्हणून काम केलेल्या दोघांचा बढती मिळालेल्यांत समावेश आहे. (Political Web Stories)

Police
Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावर संजय शिरसाटांचं सूचक वक्तव्य; म्हणाले "मी आताही..."

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पाच पीआय हे एसीपी झाले आहेत. त्यात हिंजवडी वाहतूक विभागाचे विठ्ठल कुबडे यांची शहर पोलीस दलातच बढतीवर बदली झाली आहे.दरोडा विरोधी पथकाचे रामदास इंगवले यांची डीवायएसपी,औसा, जि. लातूर, मनीष कल्याणकर यांची पोलीस डीवाएसपी,अहमदपूर, जि. लातूर,राजेंद्रकुमार राजमाने यांची डीवायएसपी चिपळूण,जि.रत्नागिरी आणि रावसाहेब जाधव यांची डीवायएसपी,सीयआयडी,पुणे येथे बदली करण्यात आली आहे. (Latest Pune News)

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com