Sanjay Shirsat on Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावर संजय शिरसाटांचं सूचक वक्तव्य; म्हणाले "मी आताही..."

Sanjay Shirsat News : नाराज आमदारांनाही पक्षप्रमुख कुठे ना कुठे सामावून घेतील
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSarkarnama

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले. या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील आठ आमदारांची नावे असल्याची शक्यता वर्तविली जात आहेत. आता शिवराज्य अभिषेक सोहळ्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तार शिवसेनेचे प्रदोत भरत गोगावले (Bharat Gogawale), प्रवक्ते संजय शिरसाट यांचाही समावेश असल्याची शक्यता आहे. यावर भरत गोगावले यांनी मंत्री होण्यासाठी मी तयारी केली आहे. त्यासाठी कपडे घेऊन तयार असल्याचे विधान गोगावले यांनी केले होते. त्यानंतर शिरसाट यांनीही मी कधीही मंत्री होण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "पक्षाचे प्रदोत असल्याचे गोगावले यांनी ड्रेस आणला असेल. मात्र मुख्यमंत्री घोषणा करतील, त्यावेळी यादीत असणाऱ्या नावांचा मंत्रिमंडळात समावेश असेल. त्यामुळे मी कुठलाही ड्रेस आणला नाही. मला याही ड्रेसवर सर्व चालते."

Sanjay Shirsat
Avinash Bhosale News : उच्च न्यायालयाचा अविनाश भोसलेंना दणका; काय आहे प्रकरण ?

आता मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा आणि शपथविधी शिवराज्य अभिषेक सोहळ्यापूर्वी होईल, असे शिवसेनेचे नेते भरत गोगावले सांगितले आहे. त्यावर शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले,"आता सर्वच भाजप, शिवसेना आणि अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराची आशा लागली आहे. परंतु त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खरी घोषणा आणि तीच खरी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख असेल."

मंत्रिमंडळात काही आमदारांनाच संधी मिळणार आहे. त्यामुळे इतर इच्छुक आमदार नाराज होण्याची शक्यता आहे. त्यावर शिरसाट म्हणाले, "सत्ताधारी पक्षातील प्रत्येक आमदाराला मंत्री होण्याचे स्वप्न असते. मात्र प्रत्येकालाच मंत्रीपद दिले जात नाही. त्यामुळे इतरांना कुठले योग्य स्थान दिले पाहिजे याबाबत संबंधित पक्षप्रमुख त्यांच्या पातळीवर निर्णय घेतील. नाराजी असली तरी प्रत्येकाला कुठे ना कुठे संधी देऊन सामावून घेतले जाते."

Sanjay Shirsat
Latur APMC Chairman Election News : चांगले काम करून बाजार समितीचा लौकिक वाढवा...

गेल्या दहा महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी, यासाठी सत्तेतील शिवसेनेसह भाजप आणि सरकारला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांनी 'फिल्डिंग' लावली आहे. मंत्रिमंडळात शिवसेनेचे (शिंदे गट) भरत गोगवले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर, चिमणराव पाटील तर अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच त्यांना मिळणाऱ्या खात्याबाबतही चर्चा आहे. भरत गोगवले यांना जलसंधारण, संजय शिरसाट यांच्याकडे परिवहन किंवा समाज कल्याण, बच्चू कडू यांच्याकडे दिव्यांग मंत्रीपद देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com