Uddhav Thackeray Shiv Sena : ठाकरेंच्या निष्ठावंत, सुलभा उबाळे चार वर्षांनंतर पुन्हा ॲक्टिव्ह; भोसरीतून लढण्याची शक्यता

Uddhav Thackeray Loyalist Sulabha Ubale : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला मोठे खिंडार पडले आहे. आता उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंत नेत्या सक्रिय झाल्याने भाजप समोर आव्हान निर्माण झाले आहे.
uddhav thackeray, sulabha ubale
uddhav thackeray, sulabha ubaleSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : बरोबर एक वर्षानंतर राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ती होणार असली, तरी तिची तयारी सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या इच्छुकांनी आतापासूनच सुरू केलेली आहे. पिंपरी-चिंचवडमधील भोसरी हा विधानसभा मतदारसंघही त्याला अपवाद नाही. तेथून ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा संघटिका (शिरूर) आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे पुन्हा ॲक्टिव्ह मोडवर आल्या आहेत. त्यातून त्या भोसरीतून पुन्हा लढण्याची चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

uddhav thackeray, sulabha ubale
Thackeray Shiv Sena : एकाच दिवशी दोन पवारांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला डबल धक्का

उबाळे या एकनिष्ठ, आक्रमक आणि अभ्यासू शिवसेना कार्यकर्त्या तथा पदाधिकारी म्हणून ओळखल्या जातात. शिवसेना फुटीनंतर त्या मूळ शिवसेनेतच राहिलेल्या आहेत. यापूर्वी दोनदा २००९ आणि २०१४ ला भोसरीतूनच त्यांनी विधानसभा लढवली, पण पराभूत होऊनही त्यांनी पक्ष सोडला नाही. तीनदा त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. विरोधी पक्षनेता, गटनेता म्हणून काम त्यांनी केले आहे. सध्या त्या जिल्हा संघटिका आहेत.

शिवसेना दुभंगल्यानंतर आणि अजित पवार युती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडसह राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यातून उबाळे यांना भोसरीत पुन्हा संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथून त्या पु्न्हा अधिक ॲक्टिव्ह झाल्या आहेत.

भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. पण त्यापूर्वीच त्यांनी उबाळेंना फोन करून येत असल्याचे सांगितले होते. त्यातून उबाळेंचे पक्षातील वजन दिसून आले. तसेच त्या आज पवारांच्या पक्ष प्रवेशावेळी मातोश्रीवर उपस्थितही होत्या. त्यांचे पती रामभाऊ उबाळे हेही एकनिष्ठ व आक्रमक असे जुने शिवसैनिक आहेत.

पवार हे २०१४ ला एकदा, तर उबाळे या २००९ आणि २०१४ अशा दोनदा भोसरीतून विधानसभा लढल्या आहेत. मात्र, या वेळी पवार हे नांदेडमधील गावी लोहा-कंधारमधून आमदारकी लढणार आहेत. तशी जोरदार तयारी त्यांची तिकडे काही महिन्यांपासून सुरू आहे. परिणामी या वेळी भोसरीतून इच्छुक असलेल्या उबाळेंना त्यांच्या प्रवेशामुळे काही अडचण होणार नाही. उलट पक्षबांधणीसाठी पवारांची पॉवर त्यांना मिळणार आहे. भोसरीत मराठवाड्यातील पन्नास हजार मते असून, त्यातील अनेक पवारांना मानणारे आहेत. तसेच त्यांना २०१४ ला मिळालेली मतेही या वेळी उबाळेंच्या पारड्यात जाणार आहेत. त्यामुळे त्या पुन्हा ॲक्टिव्ह मोडवर आल्या आहेत.

Edited By : Sachin Fulpagare

uddhav thackeray, sulabha ubale
Thackeray Group News : भाजपला मोठा धक्का; एकनाथ पवारांचा ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंना दिलं हे वचन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com