Chinchwad By Election: 'कसबा पॅटर्न' चिंचवडमध्येही यशस्वी होणार? कलाटे माघार घेणार की उमेदवारीवर ठाम राहणार?

Rahul Kalate & MVA : राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून वरिष्ठ पातळीवरुन चर्चा सुरु
Rahul Kalate, Ashwini Jagtap, Nana Kate
Rahul Kalate, Ashwini Jagtap, Nana KateSarkarnama
Published on
Updated on

Pimpri chinchwad Political News : कसब्यात तिकीट नाकारल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेच वातावरण पसरलं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह काँग्रेससह हायकमांडपर्यंत सर्वांनी दाभेकरांची मनधरणी केली होती.

यानंतर दाभेकरांनी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसनं सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर आता चिंचवडमध्येही महाविकास आघाडीची शिष्टाईला यश येणार की ठाकरे गटाचे नेते व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे आपल्या उमेदवारीवर ठाम राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे(Rahul Kalate) यांनी माघार घ्यावी म्हणून आज गुरुवारी (ता. ९) स्थानिक पातळीवरील नेत्यांनी प्रयत्न केले. परंतु; त्यास यश आले नाही. त्यामुळे कलाटे निवडणूक लढविण्याबाबत आजपर्यंत ठाम होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांना माघार घेण्याबाबत बोलणार आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवणूक येत्या दिनांक २६ फेब्रुवारी रोजी होत आहे. कलाटे यांनी माघार न घेतल्यास प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्‍विनी जगताप, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल उर्फ नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

Rahul Kalate, Ashwini Jagtap, Nana Kate
ZP : सभापतींच्या घरांतून साहित्य गायब, विरोधक म्हणतात चौकशी करा, तर अध्यक्षांचा नकार !

पक्षाचे निरीक्षक, आमदार सुनील शेळके(Sunil Shelke) यांनी कलाटे यांच्याशी अजित पवार यांनी बोलावे, अशी त्यांना विनंती केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी रात्री किंवा उद्या शुक्रवारी (ता. १०) सकाळी कलाटे यांच्याशी माघार घेण्याबाबत बोलणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, संजोग वाघेरे यांनी दिली. तर; शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पुणे व पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर उद्या सकाळी १० वाजता कलाटे यांच्याशी शहरात येवून बोलणार आहेत. यावेळी अहिर माघार घेण्यासाठी कलाटे यांची पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबरोबर मोबाईलद्वारे चर्चा घडवून आणू शकतात.

Rahul Kalate, Ashwini Jagtap, Nana Kate
Pune By-Election: पोटनिवडणुकांसाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

अजित पवार यांनी घेतली आढावा बैठक

अजित पवार(Ajit Pawar) यांनी आज गुरुवारी (ता. ९) माजी नगरेसवक मोरेश्‍वर भोंडवे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी प्रचाराबाबत चर्चा केली. तसेच; शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशीही प्रचाराबाबत नियोजन केले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले, उप जिल्हाप्रमुख रोमी संधू, अनंत कोऱ्हाळे, सतोष पवार आदि उपस्थित होते.

कलाटेंनी माघार घ्यावी म्हणून....

राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून वरिष्ठ पातळीवरुन चर्चा सुरु आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे व पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख सचिन अहिर उद्या शुक्रवारी (ता. १०) सकाळी १० वाजता बोलणार आहेत.

- सचिन भोसले, शहर प्रमुख, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com