Political Horoscope: ट्रम्प यांच्यासाठी प्रतिकूल काळ; महाभियोग आणला जाऊ शकतो...

US President Donald Trump impeachment News: भविष्यनामा : २३ते २९ ऑगस्ट २०२५ :रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता राहील. ट्रम्प यांच्या आयात शुल्कामुळे अनेक देशांची आर्थिक धोरणे बिघडण्याची शक्यता आहे.
Donald Trump
US President Donald Trump Sarkarnama
Published on
Updated on

सिद्धेश्वर मारटकर

सप्ताहात गणेशोत्सवाची सुरुवात होत असून, विघ्नहर्ता देश व प्रजेचे विघ्न हरण करून नैसर्गिक आपत्ती, युद्ध, रोग, शत्रूपिडा यांपासून संरक्षण करून देश व प्रजेचे रक्षण करेल, यात शंका नाही. २३ ऑगस्टच्या अमांत कुंडलीत गुरू भाग्यस्थानी असल्यामुळे गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडेल. लग्नस्थानावर गुरूची दृष्टी असल्यामुळे जनता आनंदी, समाधानी राहील.

राजकीय क्षेत्रात मोठे फेरबदल पुढील काळात संभवतात. प्रमुख पदांवरील व्यक्ती राजीनामे देतील. राज्य व केंद्रातील मंत्रिमंडळांमध्ये महत्त्वाचे फेरबदल होतील. पक्षाध्यक्ष, मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती यांसारख्या प्रमुख पदांवर नवीन नेतृत्वाला संधी मिळेल. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, विधानसभा बरखास्तीचे निर्णय होतील. महत्त्वाच्या राज्यातील सरकार अस्थिर होण्याची शक्यता राहील. या काळात ज्येष्ठ नेत्याच्या मृत्यूची घटना संभवते.

१७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या काळात मघा नक्षत्र असून, या नक्षत्रावर अल्पवृष्टी संभवते. कमी पावसामुळे काही प्रदेशांत दुष्काळसदृश स्थिती राहील. पिकांचे नुकसान संभवते. १७ ते २३ ऑगस्टमध्ये उत्तर महाराष्ट्र व उत्तर भारतात मोठी वृष्टी होईल. या काळात उत्तर भारतातील नैसर्गिक आपत्तीचा धोका कायम राहील. भूकंप, अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तीतून मोठी हानी होण्याची शक्यता वाटते. शनी-मंगळाचा प्रतियोग सुरू असल्यामुळे दहशतवादी कारवायांचा धोका संभवतो.

या योगामुळे काही संसर्गजन्य विकार संभवतात. लहान मुले, विद्यार्थी यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. या योगामुळे शेअर मार्केटमध्ये मोठी गोंधळाची स्थिती निर्माण होईल. सोन्या-चांदीच्या भावातील तेजी कायम राहील. रुपयाचे मूल्य वाढेल. खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल असून, मोठ्या स्पर्धांमध्ये पराभवाचा सामना करावा लागेल. खेळाडूंच्या दुखापती, अपघात, वादाचे प्रसंग या काळात संभवतात.

Donald Trump
Harshvardhan Sapkal: किती शेतकऱ्यांचे बळी घेतल्यावर कर्जमाफी करणार? फडणवीस, अजितदादा, शिंदे यांच्यावर सपकाळ संतापले

पोलिस, लष्करासाठी हा काळ प्रतिकूल राहील. जवानांवर हल्ले होण्याची शक्यता राहील. या काळात गुन्हेगारीमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, मोठे गुन्हेगार पकडले जातील. गुन्हेगारांना शिक्षा, तुरुंगवास होईल. पुढील काळात मंगळाचे भ्रमण तूळ राशीतून होत असून, मंगळ-हर्षल षडाष्टक योग असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धाचा धोका कायम राहील. रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता राहील. ट्रम्प यांच्या आयात शुल्कामुळे अनेक देशांची आर्थिक धोरणे बिघडण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग आणला जाऊ शकतो.

डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म १४ जून १९४६ रोजीचा असून, त्यांच्या कुंडलीमध्ये सिंह लग्न उदित असून, लग्नी मंगळ व दशमात रवी व चतुर्थात पौर्णिमेचा चंद्र असल्यामुळे राजयोगाची पत्रिका झाली आहे. वृश्चिक रास व ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे एका हुकुमशहासारखी मनोवृत्ती दर्शविते. दशमात रवी-राहू युती झाल्यामुळे अमेरिकेसारख्या मोठ्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

मात्र, सध्या लग्न राशीच्या अष्टमातील शनीचे गोचर भ्रमण ट्रम्प यांच्यासाठी प्रतिकूल असल्यामुळे २०२५ ते जून २०२७पर्यंतचा काळ त्रासदायक राहू शकतो. अमेरिकेची मिथुन रास असून, राशीच्या दशमातून होणारे शनीचे भ्रमण अमेरिकेसाठी कटकटीचे राहू शकते. या परिणामांमुळे ट्रम्प यांच्यावर अपयशाचा ठपका बसू शकलो. अनेक देशांच्या विरोधामुळे अमेरिका व ट्रम्प एकाकी पडल्याचे चित्र निर्माण होऊ शकते.

साप्ताहिक राशिभविष्य २३ ते २९ ऑगस्ट २०२५

मेष : सप्ताहात होणारी अमावस्या घर, वाहन, मालमत्तेचे व्यवहार करण्यासाठी अनुकूल राहणार आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील. महत्त्वाची कागदपत्रे, व्यवहार पूर्ण होतील.

वृषभ : घर, जागेविषयी कागदपत्रे होतील. कलाकार, खेळाडूंना मोठे यश, प्रसिद्धी मिळेल. धन स्थानानील चंद्र-गुरू युती आर्थिक लाभ मिळवून देणारी राहील. मोठी गुंतवणूक कराल. कुटुंबात आनंदाची घटना घडेल.

मिथुन : घर-जागा विक्रीतून धनलाभ होईल. चंद्र-गुरू युतीमुळे मन आनंदी-प्रसन्न राहील. धार्मिक आचरण, आवड वाढेल. आरोग्यात उत्तम सुधार‌णा होईल. चंद्र-शुक्र युतीमुळे मोठे आर्थिक लाभ होतील.

कर्क : व्यायाम, पथ्यपाणी, आहार नियंत्रण यांकडे कल राहील. राशीतील चंद्र-शुक्र युती कला, मनोरंजन, प्रवास यांतून आनंद देणारी

राहील. तरुणांचे विवाह जमतील. चंद्र-गुरू युती मोठे प्रवास, परदेशगमनासाठी अनुकूल राहील.

सिंह : प्रवास, सहली, मेजवानी यातून आनंद मिळेल. लाभस्थानातील चंद्र-गुरू युती मोठी इच्छा पूर्ण करणारी असून, मोठे लाभ होतील. उत्पन्नात मोठी वाढ होईल.

कन्या : जुनी येणी वसूल होतील. जागा-मालमत्तेपासून लाभ होईल. चंद्र-गुरू युतीमुळे व्यवसायात वाढ होईल. नवीन नोकरी-व्यवसायाची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात पद-प्रतिष्ठा लाभेल.

तूळ : नोकरीत पदोन्नती मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मोठे पद-प्रतिष्ठा लाभेल. चंद्र-गुरू युती भाग्यस्थानी होत असल्याने धार्मिक विधी, तीर्थयात्रा होईल. चंद्र-शुक्र युतीमुळे वरिष्ठांची मर्जी राखाल.

वृश्चिक : सप्ताहात भाग्यस्थानी अमावस्या होत आहे. उत्कर्षाची नवीन संधी प्राप्त होईल. चंद्र-गुरू युतीमुळे वारसा हक्क, पेन्शन या माध्यमातून लाभ होईल. कमी श्रमातून धनलाभ होईल. उत्पन्नात मोठी वाढ होईल.

धनू : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रवास जपून करावेत. मात्र, सहज धनप्राप्ती संभवते. वारसाहक्काची कामे होतील. चंद्र-गुरू युतीमुळे तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीच्या व्यवसायाची संधी निर्माण होईल.

मकर : व्यवसायातील कटकटी कमी होतील. भागीदाराशी असणारे मतभेद संपतील. कोर्टकचेरीमध्ये सामंजस्याने मार्ग निघेल. षष्ठातील चंद्र-गुरू युती आरोग्यासाठी प्रतिकूल राहील. हितशत्रूंचा उपद्रव संभवतो.

कुंभ : नोकरीच्या निमित्ताने प्रवास होतील. हाताखालच्या लोकांकडून मनस्ताप संभवतो. स्त्री वर्गाशी मतभेद टाळावेत. पंचमातील चंद्र-गुरू युती संततीविषयी चिंता कमी करणारी राहील. विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल.

मीन : पंचमस्थानी होणारी अमावस्या संततीविषयी चिंता निर्माण करणारी राहील. मात्र, शेअर्ससारख्या व्यवसायात लाभ होईल. तरुणांना प्रेमप्रकरणात यश मिळेल. मनासारखा जोडीदार-मित्र भेटेल. घरातील वातावरण आनंदी राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com