
१७ ऑक्टोबरच्या तूळ संक्रमण कुंडलीमध्ये मकर लग्न उदित असून, दशमस्थानी रवी, मंगळ, बुध असून, अष्टमस्थानी चंद्र-केतू, भाग्यस्थानी शुक्र, तृतीयस्थानी शनी-नेपच्यून व षष्टस्थानी गुरू अशी ग्रहस्थिती आहे. एकूण ग्रहस्थितीचा विचार करता दशमातील रवी-मंगळ योग देशाची प्रतिष्ठा वाढविणारा आहे. सत्ताधारी पक्षाचे बळ या काळात वाढलेले दिसेल. कला, क्रीडा क्षेत्रामध्ये देशाला मोठे यश मिळेल. तसेच, या योगामुळे युद्धासारखे प्रसंग निर्माण झाल्यास शत्रू राष्ट्रावर विजय मिळेल. मात्र, अष्टमातील चंद्र-केतू योग प्रजेसाठी प्रतिकूल राहील. लहान मुले, महिला यांच्यासाठी हा काळ त्रासदायक राहील. साथीचे विकार वाढण्याची शक्यता राहील.
शनी-नेपच्यून-राहू योगामुळे राजकीय क्षेत्रात नाट्यमय घडामोडी होतील. विश्वासघाताचे राजकारण होऊन काही ठिकाणी सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता राहील. मोठे पक्ष फुटतील. मोठ्या व्यक्तींचे गूढ मृत्यू व आत्महत्या, राजीनामे या काळात संभवतात.
पोलिस आणि लष्करासाठी हा काळ उत्तम असून गुन्हेगार, दहशतवादी, नक्षलवादी पकडले किंवा मारले जातील. शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती दर्शविते; मात्र मार्केटमध्ये तेजी राहील. मोठ्या व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप या काळात संभवतात. सत्ताधारी पक्षांवर मोठे आरोप होतील. या काळात मोठी विमान/रेल्वे दुर्घटना संभवते. परदेश प्रवास महाग होतील. व्हिसा, पासपोर्ट, परदेश प्रवास यांच्या नियमांत मोठे बदल होतील. अपघात, भूकंप, वादळे यांसारख्या आपत्तीमधून सामूहिक मृत्यूच्या घटना या काळात संभवतात.
मोठ्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू किंवा राजीनाम्याची शक्यता या काळात राहील. देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये काही काळ गोंधळ संभवतो. शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता राहील. शनी-नेपच्यून योगामुळे मोठी विमान किंवा जहाज दुर्घटना होण्याची शक्यता असून, विमान किंवा जहाजाचे अपहरण किंवा भरकटण्याची शक्यता राहील.
मोठ्या पूर/पावसामुळे जीवितहानी संभवते. वादळ, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची शक्यता या काळात संभवते. षष्ठातील गुरूमुळे मोठे साथीचे विकार या काळात संभवतात. मोठे आजार पसरण्याची शक्यता राहील. या योगामुळे धार्मिक-सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचे आजारपण किंवा तुरुंगवास संभवतो. डॉक्टर व शिक्षकांचे संप या काळात होण्याची शक्यता असून, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या घडामोडी शक्य आहे. धर्मगुरू, डॉक्टर, शिक्षक यांच्यावर आरोप होतील.
या तीन महिन्यांत निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्षाला मोठे यश मिळेल. युती/आघाडीमध्ये फूट पडेल. मोठे आर्थिक घोटाळे या काळात उघडकीस येतील. शेजारील राष्ट्रांकडून कुरापती होतील. सीमेवर तणाव वाढण्याची शक्यता राहील. पोलिस-लष्कराला दक्षतेचे आदेश दिले जातील. प्रमुख देशांमध्ये या काळात युद्ध भडकण्याची शक्यता राहील.
सायन तूळ संक्रमण कुंडलीनुसार षष्ठेश गुरुस्थानी असल्याने प्रजेच्या आरोग्याची चिंता राहील. मात्र धार्मिक स्थळे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू यांचे पुनर्वसन या काळात होण्याची शक्यता राहील. सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतील. ऐतिहासिक वास्तूची निर्मिती होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.