Political Horoscope: काही ठिकाणी तोडफोड, आंदोलनं ; आव्हानांचा काळ, शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण

Share market fall: गुंड, अतिरेकी, नक्षलवादी यांचे आत्मसमर्पण मोठ्या प्रमाणावर होतील. गुन्हेगारांना मोठी शिक्षा जाहीर होईल. कायदे, न्यायव्यवस्था यांचा प्रभाव वाढेल.
Bhavishyanama
Bhavishyanama Sarkarnama
Published on
Updated on

सिद्धेश्वर मारटकर

सप्ताहातील ग्रहमानाचा विचार करता या सप्ताहात शुक्र-शनी युती व मंगळ-शनी नवपंचम योग होत आहे. ग्रह योगाचा विचार करता सप्ताहाच्या सुरुवातीला हवेतील उष्णतेमध्ये मोठी वाढ होऊन अवकाळी पावसाची शक्यता राहील. या काळात आगीच्या दुर्घटना, भूकंप यातून घरांची पडझड व मोठी हानी होण्याची शक्यता राहील.

अवकाळी पावसामुळे द्राक्षे, आंबा यांसारख्या फळपिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई, दुष्काळग्रस्त स्थिती अनुभवास येईल. चंद्र-मंगळ युतीमुळे काही ठिकाणी हिंसा, तणाव, निदर्शने, तोडफोड, आंदोलने यांमुळे अशांतता निर्माण होईल. सप्ताहाच्या मध्यावर शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता राहील.

या काळात काही कलाकारांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता राहील. स्त्री वर्ग, कलाकारांसाठी सप्ताह प्रतिकूल राहील. कायदेशीर कारवाई, दंड, शिक्षा, तुरुंगवास यांसारख्या घटना शक्य असून, एखाद्या मोठ्या स्त्री किंवा कलाकाराचा मृत्यू या काळात संभवतो. शुक्र-शनी योगामुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण होण्याची शक्यता राहील.

या योगामुळे चोरी, अपहरण, सायबर क्राइम या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसेल. घर, दुकानावरील दरोडे वाढतील. व्यापारी वर्गावर प्राप्तिकर विभागाचे छापे पडतील. रुपयाचे अवमूल्यन होण्याची शक्यता असून, देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये घसरण होण्याची शक्यता राहील. परदेश प्रवास महाग होतील. हवेतील बदलामुळे काही विमानसेवा विस्कळित होतील.

Bhavishyanama
Kedar Jadhav: पुण्याचा पठ्ठ्या क्रिकेटच्या मैदानातून राजकीय आखाड्यात; 'या' पक्षात एन्ट्री

अवकाळी पाऊस, बर्फवृष्टी, गारपीट यांमुळे काही प्रदेशातील जनजीवन विस्कळित होईल, परदेशातील समुद्रकिनारी प्रदेशांत भूकंप, त्सुनामीसारख्या घटनांमधून मोठी हानी होण्याची शक्यता राहील. या काळात काळी संसर्गजन्य विकार, साथीचे विकार यांचा धोका निर्माण होईल. लहान मुले, विद्यार्थी यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. परीक्षा निकाल, नवीन प्रवेश, अभ्यासक्रम किंवा प्रवेश परीक्षा यांमध्ये गोंधळ अनुभवास येईल. लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना अनुभवास येतील.

बँका, अर्थसंस्था यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. मोठा भ्रष्टाचार या काळात उघडकीस येईल. बँकांमधील बुडीत खाती वाढतील. कर्जबाजारी व्यावसायिकांमुळे बँका अडचणीत येतील. बँकांना मोठे नुकसान सहन करावे लागेल. या काळात विमान, जहाज वाहतूक, प्रवास महाग होईल. व्हिसा, पासपोर्ट यांचे नियम कडक होतील. परदेशी नोकऱ्यांमध्ये घट झाल्याने परदेशात नोकरी करणाऱ्यांमधील तणाव वाढेल. या काळात बेरोजगारीमध्ये वाढ होऊन नोकरकपात होईल.

Bhavishyanama
Sharad Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मोदी सरकारला डिवचलं; Video व्हायरल! आम्ही पुन्हा एकदा...

या काळात शनी-मंगळ नवपंचम योग होत आहे. यामुळे पोलिस, लष्कर यांना मोठे गुन्हेगार पकडण्यात मोठे यश मिळेल. मोठे गुंड, अतिरेकी, नक्षलवादी यांचे आत्मसमर्पण मोठ्या प्रमाणावर होतील. गुन्हेगारांना मोठी शिक्षा जाहीर होईल. कायदे, न्यायव्यवस्था यांचा प्रभाव वाढेल. मोठे कायदेशीर निकाल गाजतील. या काळात लेखक, कलाकार, राजकीय व्यक्ती यांना कारवायांना तोंड द्यावे लागेल. वादग्रस्त वक्तव्यांमुळे या क्षेत्रातील व्यक्ती अडचणीत येतील. एखाद्या चित्रपटातील प्रसंगावरून वादविवाद होतील.

या काळात आयपीएलसारख्या स्पर्धेचा रोमांच वाढण्याची शक्यता असून, रंगतदार सामन्यांमुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळेल. खेळाडूंसाठी सध्याचा काळ अनुकूल असून, अनेक तरुण खेळाडूंचा उदय होईल. या काळात अपहरण व आत्महत्यांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असून, कर्जबाजारीपणा किंवा नैराश्य, संशयावरून होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण वाढेल.

साप्ताहिक राशिभविष्य ५ ते ११ एप्रिल

मेष : घर, जागांच्या कामात कटकटी संभवतात. नातेवाईक, भावंडाशी गैरसमज होतील. मोठे प्रवास, सहली कराल. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीची संधी मिळेल.

वृषभ : मोठी इच्छा पूर्ण होईल. मित्रांबरोबर पार्टी, मनोरंजन सहलीचा आनंद घ्याल. मोठे धाडसी निर्णय घ्याल. कर्तृत्वाची संधी मिळेल. जागा, जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील.

मिथुन : सप्ताहात नोकरी/व्यवसायात चांगले बदल संभवतात. आरोग्यात चांगली सुधारणा होईल. बोलताना काळजी घ्यावी. कुटुंबात कलह संभवतो. मोठे खर्च होतील. कलाकारांसाठी नवीन संधी देणारी राहील.

कर्क : सप्ताहाची सुरुवात प्रवासाने होईल. तीर्थयात्रा, नातेवाइकांकडे येणे-जाणे होईल. आरोग्यात मोठी सुधारणा होईल. स्वभाव आक्रमक होईल. वादविवादात सरशी होईल. प्रसिद्धी पुरस्कार मिळतील.

सिंह : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रवास जपून करावेत. प्रवासात चोरांपासून सावध राहावे. अचानक मोठे खर्च होतील. वारसा हक्क, विमा, वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधून मोठा लाभ मिळेल.

कन्या : लाभातील चंद्र-मंगळ युती शत्रूवर विजय मिळविणारी राहील. कोर्टकचेरीमध्ये मोठे यश मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह जमतील. भागीदारीच्या व्यवसायात मोठा फायदा होईल.

तूळ : मोठी कामे सहज होतील. नोकरीमध्ये प्रमोशन, बढती मिळेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रभाव वाढेल. विवाह जीवनात मतभेद संभवतात. परदेशातील नोकरीचे प्रयत्न होतील.

वृश्चिक : सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवास जपून करावेत. चंद्र-मंगळ युती मुळे धार्मिक, मंगल कार्य घडेल. पदवी, पुरस्कार, प्रसिद्धी मिळेल. विद्यार्थी वर्गाला परीक्षेत मोठे यश मिळेल. मुलांचे प्रश्न मार्गी लागतील.

धनू : शारीरीक, मानसिक कष्ट, त्रास देणारी आहे. प्रवासात वाहन चालविताना काळजी घ्यावी. अपघात, आरोग्याची तक्रार राहील. वाहन, जागा, प्रॉपर्टी खरेदी होईल. घरातील वातावरण आनंदी राहील.

मकर : सप्ताहातील चंद्र-मंगळ युती जोडीदाराशी कलह वाढविणारी राहील. पार्टनरशिपमधील व्यवसायात कटकटी संभवतात. कोर्टकचेरीच्या कामात मनस्ताप संभवतो. जवळच्या नात्यातील विवाह जमतील. कलाकारांना यश, प्रसिद्धी मिळेल

कुंभ : नोकरीमध्ये बदल किंवा बदली होईल. आरोग्य उत्तम राहील. मात्र भावंडे, नातेवाइकांशी मतभेद संभवतात. वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. उत्पन्नात मोठी वाढ संभवते. मोठी गुंतवणूक कराल.

मीन : पंचमातील चंद्र-मंगळ युती मुलांशी मतभेद निर्माण करणारी असून, संततीकडून मनस्ताप संभवतो. शेअर्ससारख्या व्यवसायात गुंतवणूक होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत कष्ट पडतील. तरुणांचे विवाह जमतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com