Maharashtra Education Policy : महाराष्ट्रात आता इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीची!

Hindi Compulsory in Primary Schools : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) पायाभूत आणि शालेय स्तरासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडे तयार केले आहेत. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने या दोन्ही आराखड्यांना मंजूरी दिली आहे.
Hindi Now Compulsory in Maharashtra Primary Schools
Hindi Now Compulsory in Maharashtra Primary SchoolsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Hindi Mandatory in Schools : महाराष्ट्रात आता इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकणं सक्तीचं करण्यात आलं आहे. 2024 च्या राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडानुसार आता मराठीसह इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत मराठी, इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

तर मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांशिवाय अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये (School) पहिली ते पाचवीपर्यंत माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी या तीन प्रमुख भाषा शिकवणं सक्तीचं असणार आहे. येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून या या नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Hindi Now Compulsory in Maharashtra Primary Schools
Waqf Amendment Act : हिंदूंच्या धार्मिक ट्रस्टवर मुस्लिमांना घेणार का? 'वक्फ'वरून सुप्रीम कोर्टाने सुनावले, मोठा निर्णय देण्याच्या तयारीत!

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) पायाभूत आणि शालेय स्तरासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडे तयार केले आहेत. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने या दोन्ही आराखड्यांना मंजूरी दिली आहे.

Hindi Now Compulsory in Maharashtra Primary Schools
Satpeer Dargah : नाशिकमधील दर्ग्यावरील कारवाई महापालिकेच्या अंगलट येणार? सर्वोच्च न्यायालयाने दिले स्थगितेचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

त्यानंतर शालेय शिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. सुकाणू समितीने मान्यता दिलेल्या आराखड्यातच हिंदी सक्तीने शिकवण्याबाबतच्या प्रस्तावावर याआधी टीका करण्यात आली होती. मात्र, आता शासन निर्णयामुळे शाळेत हिंदी सक्तीने शिकवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.