Madhya Pradesh Police : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून शनिवारी सातव्या म्हणजे अखेरच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. ही ड्यूटी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या IPS निवेदिता नायडू यांची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
मध्य प्रदेशातील उमरियाच्या पोलिस अधिक्षक निवेदिता नायडू आठ महिन्यांच्या गर्भवती आहेत. पण त्यानंतरही त्या जबाबदारीपासून मागे हटलेल्या नाहीत. अनेकदा रात्रभर घराबाहेर पडून त्या इतर सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत गस्तीवर निघतात. त्यांचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
गर्भवती महिलांना अधिकचा कामाचा ताण थकवणारा असतो. त्यातही पोलिस अधिकारी म्हटले की अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर असतात. आठ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या निवेदिता नायडू मात्र आपल्या कर्तव्यापासून मागे हटलेल्या नाहीत.
निवेदता नायडू यांचे पती दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पोलिस अधिक्षक आहेत. घरी तीन वर्षांची मुलगी सोडून त्या ड्यूटीसाठी मध्यरात्रीही घराबाहेर पडत आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. गर्भवती महिलांना मॅटर्निटी लिव्ह मिळते. मात्र त्या हक्काची सुट्टी न घेता जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी झटत आहेत.
निवेदिता नायडू या 2016 च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. आधी त्या मंडला जिल्ह्यात नियुक्तीस होत्या. 3 ऑगस्ट 2023 मध्ये त्यांची उमरिया जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकपदी बदली झाली.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काळातही त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक झाले होते. आता लोकसभा निवडणुकीया काळातही त्यांनी आपल्या कामाने सर्वांची मने जिंकली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.