
विद्यार्थ्यांना कपाट उचलायला लावणं शिक्षिकेला चांगलचं भोवलं आहे. यामुळे त्यांची पदोन्नती रद्द करण्यात आली आहे. याबाबत त्यांना नोटीस बजावली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात हा प्रकार नुकताच घडला.
शाळेतील विद्यार्थ्यांना वर्ग खोली स्थलांतरित करताना येथील कपाट व अन्य साहित्य उचलण्यास सांगितले होते, याबाबत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शिक्षिकेची पदोन्नती रद्द केली आहे. यांची चर्चा सध्या शैक्षणिक वर्तुळात सुरु आहे. संबंधित शिक्षिकेला या निर्णयाविरोधात अपील करण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
पर्यवेक्षकीय कामात कसूर केल्याप्रकरणी शिक्षण विभागातील एका महिला कर्मचाऱ्याची एक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपात रोखण्यात आली होती. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याचा पदोन्नतीचा प्रस्ताव सादर केला. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला पदोन्नती देण्यात आल्याचे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
शिक्षिकेची काही महिन्यांपूर्वी उच्च पदावर पदोन्नती करण्यात आली होती. मात्र या पदोन्नती प्रक्रियेमध्ये प्रक्रियात्मक त्रुटी, कागदपत्रांची अपूर्णता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची संमती न घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात काही स्थानिक शिक्षक संघटनांनी तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी गटशिक्षण अधिकाऱ्यांसह संबंधित महिला कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी नोटिस बजावण्यात आली होती. संबंधित महिला कर्मचाऱ्याची पदोन्नती रद्द केली आहे. "प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नसल्याने व नियमांचे उल्लंघन झाल्याने ही पदोन्नती वैध मानता येणार नाही," असे त्यांनी आदेशात म्हटलं आहे.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील केंद्रप्रमुख या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असताना त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना वर्ग खोली स्थलांतरित करताना साहित्य व ओझे उचलायला लावले होते. याप्रकरणी पर्यवेक्षकीय कामकाजात कसूर केल्याप्रकरणी त्यांना २० मार्च २०२५ रोजी तात्पुरत्या स्वरूपात एक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा कायम करण्यात आली होती.
संबंधित महिला कर्मचारी शिक्षेच्या अमलाखाली असताना त्याची शिक्षा पूर्ण होईपर्यंत पदोन्नतीसाठी विचार करण्याची तरतूद नाही. त्यामुळे केंद्रप्रमुखांना ४ ऑगस्ट २०२५ रोजीच्या आदेशानुसार शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी ३ वर्ग ३ पदावर दिलेली पदोन्नती रद्द करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
या कारवाईचे काही स्थानिक शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे तर असून, चुकीच्या पदोन्नती प्रक्रियेविरोधात उचललेले पाऊल हे प्रशासनाच्या पारदर्शकतेचे उदाहरण असल्याचे काही संघटनांनी म्हटलं आहे.
या कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात असा नियमबाह्य पदोन्नती प्रकरणांवर प्रशासकीय फेरचौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. "प्रशासन कोणत्याही अनियमिततेस सहन करणार नाही," असे आनंद भंडारी यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.