Ahmednagar Municipal Corporation : आयुक्त जावळेंची स्टाईलचं वेगळी, 'लेटलतिफांची' घेतली फिरकी

Commissioner Pankaj Jawale AMC Office Inspection : अहमदनगर महापालिका कार्यालयात उशिरा येणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आयुक्त पंकज जावळे यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. 122 कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयीन वेळेत हजर नव्हते.
Commissioner Pankaj Jawale
Commissioner Pankaj Jawalesarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी लेटलतिफांची शाळा घेतली. आयुक्त जावळे यांच्या हेडमास्तरकीमुळे महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये गोंधळ उडाला. कार्यालयात उशिरा येणाऱ्या लेटलतिफांना लेखी घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त जावळे यांनी काढल्या.

नगरचे आयुक्त डॉ. पंकज जावळे महापालिकेच्या प्रशासकीय मुख्य कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजताच हजर झाले होते. यावेळी बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यालयात हजर होते. यामुळे दैनंदिन काम रखडली होती. आयुक्त जावळे यामुळे लेटलतिफांवर संतापले आणि सर्व विभागाचे हजेरी रजिस्टर ताब्यात घेतले. हे रजिस्टर घेऊन प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ खुर्ची टाकून बसले. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयुक्त जावळे यांनी चांगलेच धारेवर धरले. कार्यालयीन वेळेची विचारणा केली. आयुक्त जावळेंच्या प्रश्नांच्या सरबतीसमोर लेटलतिफ कर्मचारी गहाळ झाले होते.

शिपाई यांना साडेनऊ तर, अधिकारी यांना पावणेदहा वाजेपर्यंत महापालिका (Municipal Corporation) कार्यालयात हजर असणे बंधनकारक असतानाही अधिकारी कर्मचारी साडेदहा वाजेपर्यंत कार्यालयामध्ये येत नाही यावरून आयुक्त पंकज जावळे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. त्यांच्या वाढलेल्या संतापासमोर उभी राहण्याची कोणी हिंमत दाखवली नाही. अधिकारी, कर्मचारी जो उशिरा येईल, त्यांना आयुक्त जावळे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. या लेटलतिफांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

Commissioner Pankaj Jawale
Maharashtra Police : दोन महिन्यानंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर; साडेचारशे 'एपीआय'साठी गूड न्यूज!

महापालिकेच्या मुख्य कार्यालयात एकूण 155 कर्मचारी अधिकरी काम करत असून, त्यातील कामावर 16 कर्मचारी वेळेवर हजर होते. 122 कर्मचारी उशिरा आले होते. याशिवाय अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त आणि सर्व विभागप्रमुख वेळेत हजर नसल्याचे आयुक्त जावळे यांच्या तपासणी आढळले.

महापालिका कार्यालयात उशिरा येणारे कर्मचारी, अधिकारी, प्रभाग अधिकारी, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आयुक्त पकंज जावळे यांच्या आदेशाप्रमाणे या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावत 1 हजार रुपये दंड करण्यात आला.

Commissioner Pankaj Jawale
BMC News : मुंबईतील 105 ठिकाणांची रेकी; बचाव; मदतकार्यासाठी आपत्कालीन यंत्रणांनी केली चाचपणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com