Ajit Dada marathon meetings : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज(शनिवार) पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त अजित पवार यांनी सकाळी नऊ वाजल्यापासूनच महत्त्वपूर्ण बैठकांना सुरुवात केली आहे. सकाळपासून पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी निगडित असलेल्या विविध विभागांच्या बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये अजित पवारांनी पुणे शहराशी निगडित असलेल्या विषयांवरती महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी अर्धवट अवस्थेत असलेली बीआरटी मार्गिका तातडीने काढून टाकण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी महापालिका आयुक्तांना दिले. तसेच एनएचआय च्या माध्यमातून होणारा वाघोली पर्यंतचा दुमजली उड्डाणपूल थेट विमाननगर पर्यंत करण्याचे निर्देशही पवार यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांना दिले.
वडगाव शेरी मतदार संघातील पाणी टंचाईचा प्रश्न आणि नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी यासंदर्भात पालकमंत्री पवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. याबैठकिला, वडगाव शेरीचे माजी आमदार सुनिल टिंगरे, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त प्रदिप चंद्रन, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप आदी उपस्थित होते.
बैठकीत माजी आमदार सुनील टिंगरे(Sunil Tingre) यांनी नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा गंभीर बनलेला प्रश्न आणि बीआरटी मार्गिकेत होणारे अपघात टाळण्यासाठी सोमनाथ नगर चौक ते खराडी बायपास चौक या दरम्यानची अर्धवट बीआरटी मार्गिका काढण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली. त्यावर पवार यांनी आयुक्तांना ही बीआरटी मार्गिका तत्काळ काढण्याचे निर्देश दिले. त्यावर आयुक्तांनी तातडीने कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले.
याचबरोबर नगर रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचआय) शिरूर ते वाघोली दरम्यान जो दुमजली उड्डाणपूल करण्यात येणार आहे, तो वाघोलीपर्यंत न करता तो थेट विमाननगर मधील फिनिक्स मॉल पर्यंत करण्यात यावा असे थेट आदेश पवार यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांना थेट दूरध्वनीवरून दिले. या कामासाठी आवश्यक एनओसी महापालिकेने द्याव्यात अशा सूचनाही पवार यांनी यावेळी दिल्या.
वडगाव शेरी मतदार संघातील वडगाव शेरी, गणेश नगर, सोमनाथ नगर, खराडी, विमाननगर या भागात गेल्या काही दिवसांपूर्वी पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता. या भागात टॅंकर चालकानी नागरिकांना पाणी पुरवठा करताना वेठीस धरण्याची तक्रार बैठकीत करण्यात आली. त्यावर पवार यांनी महापालिकेकडून ज्या टँकरने पाणी पुरवठा केला जातो त्यावर विना शुल्क (फ्री) टॅंकर असा उल्लेख करा असे निर्देश दिले. तसेच या भागातील पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करा असेही अजित पवार यांनी सांगितले.
- हाउसिंग बोर्डाच्या पूर्णविकासासाठी तत्काळ परवानगी
- येरवडा येथील म्हाडा हाऊसिग बोर्डाच्या पुर्नविकास योजनेचे काम सुरू आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या महापालिकेकडून तत्काळ मिळाव्यात यासाठी हाऊसिंग बोर्डाच्या शिष्ट मंडळाने पवार यांची भेट घेतली. त्यावर पवार यांनी नगराभियता वाघमारे यांना पूर्णविकासासाठी आवश्यक परवानग्या देण्याच्या सूचना या बैठकीत दिल्या.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.