Badlapur Rape Case: अल्पवयीन मुलींवर महाराष्ट्रात 9 दिवसात 11 अत्याचाराच्या घटना; गुन्हेगारांवर सत्ताधाऱ्यांचा वचक नाही?

Badlapur Rape Case minor girl abuse molestation cases increasing: राज्यात 72 तासात 9 घटना घडल्या आहेत. पोलिस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पालकांनी पोलिस यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली आहे.
minor girl abuse molestation cases increasing
minor girl abuse molestation cases increasing Sarkarnama
Published on
Updated on

बदलापूर शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच अशा घटनांचे सत्र सुरुच असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. काही दिवसांमध्ये बलात्कार, लैगिंक अत्याच्याराच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतानाचं भयावह चित्र आहे. अशा घटना घडल्यानंतर राजकारणही तापलं आहे. महाराष्ट्रात गेल्या 9 दिवसात ११ घटना घडल्या असून याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

बदलापूर घटनेचं तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत. असे घृणास्पद कृत करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या नराधमांना कायद्याची भीती नसल्यामुळं, ते असं राक्षसी कृत्य करण्यास धजवत आहेत, असे पालकांचे म्हणणे आहे.

बदलापूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, अकोला, भिंवडी, उल्हासनगर येथे अशा प्रकारच्या घटना घडल्याची पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. राज्यात 72 तासात 9 घटना घडल्या आहेत. पोलिस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पालकांनी पोलिस यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या मुली शाळेत सुरक्षित आहेत की नाही, असा संतापजनक प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. अशा घटनानंतर आपली चिमुरडी मुलं शाळेत देखील सुरक्षित नसल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

minor girl abuse molestation cases increasing
Girish Mahajan: 'नार-पार' वरुन गिरीश महाजन- उन्मेष पाटील यांच्यात आरपारची लढाई

अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना

  • 23 ऑगस्ट: कोल्हापुरात 10 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली.

  • 23 ऑगस्ट: मानखुर्द येथे नातेवाईकांनेच एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केला.

  • 23 ऑगस्ट: कांदीवली (मुंबई) दोन अल्पवयीन मुलींची विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

  • 23 ऑगस्ट:डोंबिवली येथे 12 वर्षीय दोन मुलींची छेडछाड करणाऱ्या युवकाला नाशिक येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.

  • 23 ऑगस्ट: पुण्यात स्कूलबसचालकांना मुलींना सोशल मीडियावरुन अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • 22 ऑगस्ट: दौंड तालुक्यात एका शिक्षकाने 3 ते 4 विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

  • 21 ऑगस्ट: सिन्नर (नाशिक) येथे घराच्या बाहेर खेळणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करुन अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे.

  • 21 ऑगस्ट:नाशिक येथे 39 वर्षीय व्यक्तीने आपल्या सावत्र मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

  • 20 ऑगस्ट: सहा मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप अकोला येथील एका शिक्षकावर आहे. शिक्षकाला अटक केली आहे. तो मुलींना अश्लील व्हिडिओ पाठवत होता.

  • 15 ऑगस्ट: सोशल मीडियावर मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला अटक केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com