Code of Conduct Violations News : बारामती लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचा पाऊस !

Baramati Lok Sabha Constituency : भोर विधानसभा मतदारसंघातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वेल्हा येथील शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली होती.
violation of code of conduct
violation of code of conductSarkarnama
Published on
Updated on

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया मंगळवारी (7 मे ) पार पडली. या मतदारसंघात मतदानाच्या अगोदर दोन दिवस आणि मतदानाच्या दिवशी आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या. या मतदारसंघात समावेश असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघातून 48 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

त्यात सर्वाधिक तक्रारी बारामती विधानसभा मतदारसंघातून आल्या असून त्याची संख्या 23 इतकी आहे. तर दौंड, इंदापूर, भोर-वेल्हा मतदारसंघातून प्रत्येकी दोन आणि खडकवासला, पुरंदर मधून प्रत्येकी तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत.

केवळ महाराष्ट्राचेच (Maharashtra) नव्हे तर देशाचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे लागले होते. या मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवित होत्या. या मतदारसंघाचे मतदान मंगळवारी पार पडले.

भोर विधानसभा मतदारसंघातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वेल्हा येथील शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. मतदानाच्या आदल्या दिवशी ही बँक रात्रीच्या वेळी सुरू ठेवल्याने संबंधित शाखेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

violation of code of conduct
Ajit Pawar News : शरद पवारांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अजितदादांना आठवलं 1986 चं साल; तेव्हा काय घडलं होतं?

याबाबत देखील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रारही देण्यात आली होती. विशेष म्हणजे या सर्व तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आलेल्या आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला जात आहे.

बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनीधींकडून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांना धमक्या देत अर्वाच्य शिवागाळ केली जात होती, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.

दरम्यान, निवडणूक कार्यालयाकडे ज्या तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये कार्यकर्त्यांना दमदाटी करणे, मतदान यंत्राची पूजा करणे, शिवीगाळ करणे, पैशांचे वाटप करणे यांचा समावेश आ आहे. त्याची शहानिशा सुरू असून ज्यामध्ये तथ्य आढळेल, त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली.

violation of code of conduct
Lok Sabha Election 2024 : खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार, कोणाचा होणार गेम? वाचा आकडेवारी

विधानसभा मतदारसंघ आणि तक्रारी

बारामती- 23

इंदापूर- 2

पुरंदर- 3

भोर- 2

खडकवासला-3

दौंड - 2

इतर - 13

violation of code of conduct
Ajit Pawar News : मी तरी 35 वर्षे साथ दिली, शरद पवारांनी अकरा वर्षांतच सोडली! अजितदादांनी जुनं काढलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com