Ajit Pawar News : शरद पवारांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अजितदादांना आठवलं 1986 चं साल; तेव्हा काय घडलं होतं?

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? अन्य कोणते प्रादेशिक काँग्रेसशी हातमिळवणी करतील, याचीही चर्चा आत्तापासून राज्याच्या आणि पर्यायानं देशाच्या राजकारणात होऊ लागली आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमधील विलिनीकरणाबाबत मोठे विधान केले होते. यावर आता राजकीय क्रिया-प्रतिक्रीया उमटत आहेत. 'भविष्यात मोदी, शहांच्या राजकारणाला कंटाळलेले, वैतागलेले प्रादेशिक पक्ष काँग्रेसचा 'हात' मजबूत करण्यासाठी विलीन होण्याची शक्यता पवार यांनी वर्तवली आहे.

शरद पवार यांच्या या भाकितामुळे राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. त्याचवेळी भविष्यात पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? अन्य कोणते प्रादेशिक काँग्रेसशी हातमिळवणी करतील, याचीही चर्चा आत्तापासून राज्याच्या आणि पर्यायानं देशाच्या राजकारणात होऊ लागली आहे. याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar News
Rajendra Gavit In BJP : एकनाथ शिंदेंना धीरे से मगर जोर का झटका; खासदार गावित भाजपमध्ये दाखल!

शरद पवारांनी प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसमधील विलिनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, "पवार साहेबांनी यापूर्वीदेखील पक्षाच्या विलिनीकरणाबाबत भूमिका घेतली होती. 1986 डिसेंबरमध्ये देखील पवार साहेबांनी समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आयमध्ये विलिन केला होता. आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत. मी लोकांमध्येच बसलो होतो. त्यावेळेसचं औरंगाबाद आणि आजचं संभाजीनगर या ठिकाणी ती सभा झाली होती, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली.

Ajit Pawar News
Rupali Chakankar News : ...म्हणून रूपाली चाकणकर यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा
Ajit Pawar News
Rajendra Gavit In BJP : एकनाथ शिंदेंना धीरे से मगर जोर का झटका; खासदार गावित भाजपमध्ये दाखल!

छगन भुजबळ प्रचारात का नाही?

"छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची तब्येत थोडीशी नरम होती. त्यामुळे ते प्रचारात सक्रिय नव्हते. शेवटी तब्येत चांगली असली पाहिजे. तब्येत चांगली असेल तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. आता तर शिरुर हा एकच मतदारसंघ आमचा राहिलेला आहे. मी पुणे जिल्ह्यातला आहे आणि महायुतीचा घटक आहे. मी सगळीकडे लक्ष देतोय. आम्ही सगळे मिळून जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहोत, असे अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com