Maharashtra Government : महापरिनिर्वाण दिनानिमित्त सरकारचा मोठा निर्णय; अनंत चतुर्दशी, दहिहंडीनंतर आता...

Mahaparinirvan Din : मुंबईत होणारी आंबेडकरी अनुयायांची गैरसोय टळणार
Devendra fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अनंत चतुर्दशी, दहिहंडीनंतर आता महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिक सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. हा आदेश मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणार असल्याचे स्पष्टपणे सरकारच्या आदेशात नमूद केले आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना दरवर्षी अनंत चतुर्दशी या दिवशी सुटी असते. दरम्यान, २००७ पासून दहीहंडी निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. या दोन सुट्ट्यांनंतर सरकारने आता २०२३ पासून महापरिनिर्वाण दिनानिमित्त तिसरी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

Devendra fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Amit Shah : देशाला दोन पंतप्रधान, दोन राज्यघटना, दोन झेंडे कसे असतील? अमित शाह लोकसभेत संतापले

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी मुंबईत येत असतात. मुंबईतील गर्दी आणि अनुयायांमुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होतो. याचा परिणाम कर्माचाऱ्यांच्या वेळेवर होतो. कर्मचाऱ्यांची ही अडचण आणि राज्यातून येणाऱ्या आंबेकरी अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे. या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, महपरिनिर्वाण दिनानिमित्त सुटी मिळावी, या मागणीने जोर धरला होता. याचा विचार करून सरकारने शासन निर्णयातील स्थानिक सुट्टीच्या तरतूदीनुसारआदेश जाहीर केला आहे. या आदेशानुसार आता मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुटीअंतर्गत वर्षातून तीन सुटट्या मिळणार आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Devendra fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Pankaja Munde : ऐन डिसेंबरमध्ये उकाडा का वाढला; पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com