Mumbai High Court : I Love You म्हणणे म्हणजे..! मुंबई हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी, 10 वर्षांपूर्वीची केस निकाली

Bombay High Court's Ruling on Sexual Harassment : नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्यासमोर ही सुनावणी झाली. हे प्रकरण 2015 मधील होते. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने 35 वर्षीय युवकाविरोधात आरोप केले होते.
Bombay High Court
Bombay High CourtSarkarnama
Published on
Updated on

Nagpur bench of the Bombay High Court : मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच महत्वपूर्ण निकाल दिला आहे. एखाद्या मुलीला I Love You म्हणणे म्हणजे ती केवळ भावनेची अभिव्यक्ती आहे. याकडे लैंगिकतेच्या भावनेतून पाहिले जाऊ शकत नाही, असे टिप्पणी हायकोर्टाने एका प्रकरणातील सुनावणी दरम्यान केली आहे. मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्यासमोर ही सुनावणी झाली. हे प्रकरण 2015 मधील होते. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने 35 वर्षीय युवकाविरोधात आरोप केले होते. त्याने आपला हात पकडून नाव विचारले आणि I Love You म्हटल्याची मुलीची तक्रार होती. ही माहिती पीडित मुलीने वडिलांना दिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात सुरूवातीला सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आरोपीला 2017 मध्ये भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. याविरोधात आरोपीने हायकोर्टात धाव घेतली. तिथे सत्र न्यायालयाचा निकाल बदलण्यात आला. संबंधित आरोपीने पीडितेसोबत लैंगिंक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे न्यायाधीशांनी म्हटले.

Bombay High Court
Maharashtra politics : आदित्य अन् अमित ठाकरेंची शाळा काढणाऱ्या CM फडणवीसांना संदीप देशपांडेंनी सुनावलं...

हायकोर्टाने निकालादरम्यान महत्वपूर्ण टिप्पणी केली. कोर्ट म्हणाले की, I Love You सारखे शब्द केवळ लैंगिक भावना दर्शवत नाहीत, जोपर्यंत त्यामागे तसा हेतू दिसत नाही. केवळ प्रेम व्यक्त करणे किंवा आपली भावना मांडणे, हे कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचाराच्या हेतूमध्ये येत नाही. हे प्रकरण छेडछाड किंवा लैंगिक छळाच्या श्रेणीमध्ये येत नाही, असे कोर्टाने निकालात स्पष्ट केले. 

Bombay High Court
Mumbai police FIR child abuse : थरकाप उडवणारी घटना; बापानं पेटत्या सिगारेटचे चिमुकलीला दिले चटके

दरम्यान, आरोपीच्या वतीने कोर्टामध्ये आपला यामागे लैंगिक अत्याचाराचा हेतू नसल्याचे म्हणणे मांडले होते. संबंधित मुलीला सातत्याने संपर्क साधला नाही, प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला नाही, असे सांगताना आरोपीने पोक्सो अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा चुकीचा असल्याचा युक्तीवाद सुनावणीदरम्यान केला होता.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com