Central Bank of India: दहावी उत्तीर्ण आहात का ? मग तुमच्यासाठी आहे बँकेत नोकरी !

Central Bank of India Recruitment: जाहिरातीमधील इतर तपशील उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावा.
Central Bank of India Recruitment
Central Bank of India RecruitmentSarkarnama
Published on
Updated on

job : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारी / सब स्टाफ पदांसह विविध रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही भरती तब्बल 484 जागांसाठी असून या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, परिक्षा शुल्क यासह सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील माहिती एकदा काळजीपूर्वक वाचावी.

या बरोबरच अधिकृत जाहिरातीमधील इतर तपशील देखील बारकाईने वाचावा. त्यानंतर आपला अर्ज करावा. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 पर्यंत आहे. त्यामुळे उमेदवारांनी सदर पदांकरीता शैक्षणिक अर्हता वाचून घ्यावी. पदभरती सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे...

Central Bank of India Recruitment
Nagpur Winter Session: पेन्शनर्ससाठी महत्त्वाची बातमी ! आता केंद्र सरकारप्रमाणे मिळणार वाढीव मोबदला

पदनाम : सफाई कर्मचारी / सब स्टाफ

पदांची संख्या किती : 484 जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता काय ? : दहावी उत्तीर्ण.

Central Bank of India
Central Bank of India

वयोमर्यादा काय असावी ? : या पदभरतीसाठी 31 मार्च 2023 पर्यंत उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 26 वर्षांपर्यंत आवश्यक आहे. यामध्ये मागास प्रवर्गांसाठी 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्गांसाठी 03 वर्षांची सुट देण्यात आली आहे.

परिक्षा शुल्क किती ? : खुला /ओबीसी प्रवर्ग करीता 850 रुपये. तर माजी सैनिक/महिला प्रवर्ग, राखीव प्रवर्ग करीता 175 रुपये.

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 09 जानेवारी 2024.

(Edited by- Ganesh Thombare)

Central Bank of India Recruitment
Maharashtra Forest Department: बांबू संशोधन-प्रशिक्षण केंद्रात नोकरी हवीय? ; 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com