Mumbai News: जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला.
याचबरोबरच आता राज्य सरकार 80 वर्षांपेक्षा जास्त वृद्ध निवृत्तीधारकांना मोठा दिलासा देणार आहे. सरकारी सेवेमधून निवृत्त झालेल्या मात्र, ज्यांचे वय 80 पेक्षा जास्त आहे, अशांना केंद्र सरकार ज्याप्रमाणे मोबदला देते त्याप्रमाणे आता राज्य सरकार देखील देणार आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवरच सरकारकडून सुबोध कुमार समिती नेमण्यात आली होती. आता या समितीने अहवाल सादर केल्यानंतर त्या अहवालाचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) दिले आहे.
कर्माचारी संघटनांच्या मागणीनुसार, 31 मे 2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदांवरील नियुक्त्यांना म.ना.से. (निवृत्तीवेतन) नियम, 1982 अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मान्य झाल्यास याचा लाभ तब्बल 26 हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.
तसेच 80 वर्षावरील सेवानिवृत्तांना केंद्र सरकारप्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करण्याबाबतचा निर्णय अंतिम टप्यात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे वृद्ध निवृत्तांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.
80 ते 85 वय असणाऱ्या निवृत्तांना 20 टक्के वाढीव मोबदला मिळणार.
85 ते 90 वय असणाऱ्या निवृत्तांना 30 टक्के वाढीव मोबदला मिळणार.
90 ते 95 वय असणाऱ्या निवृत्तांना 40 टक्के वाढीव मोबदला मिळणार.
95 ते 100 वर्षे असणाऱ्या निवृत्तांना 50 टक्के वाढीव मोबदला मिळणार.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.