Appointment of Special Executive Officer : विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी महाराष्ट्र सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील समिती ही नियुक्ती प्रक्रिया पाहणार आहे. समितीमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सदस्य असतील.
सदर नियुक्ती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी शासननिर्धारित अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या या नियमावलीत पात्रता निकष, जबाबदाऱ्या आणि निवड प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची(Special Executive Officer) नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात येईल. तसेच, नियुक्त अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांचा प्रचार, आपत्ती व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत करण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल.
यासंदर्भात माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले की, महाराष्ट्रात आता प्रत्येक 500 मतदारांमागे विशेष कार्यकारी अधिकारी राहणार आहे. यामुळे राज्यात 1 लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त होणार आहेत. तसेच, कार्यकारी अधिकारी हे शोभेचं पद नसणार आहे, तर त्यांना 13 ते 14 विशेष अधिकारही देण्यात येणार आहेत.
आजतागायत एक हजार मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असायचा. मात्र आता राज्य सरकारने नवीन अध्यायदेश काढून प्रत्येक पाचशे मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मोठ्यासंख्येत विशेष कार्यकारी अधिकारी राज्यात नेमले जातील.
तर दुसरीकडे या नवीन अध्यादेशामुळे आजपर्यंत पदावर असणाऱ्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचे पद तत्काळ प्रभावाने नाहीसे होणार आहे. अन् लवकरच प्रत्येक जिल्ह्यात नवीन अध्यादेशानुसार तेथील निवड समितीच्या माध्यमातून नवीन विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
असं बोललं जात आहे की, राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी विशेष करून सत्ताधारी पक्षांच्या स्थानिक नेत्यांसाठी चांगली संधी आहे. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू घातल्या आहेत, अशावेळी या निर्णयाचा राज्य सरकारला कितपत लाभ होतो, हे पाहावे लागणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.