
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी. सीआयडीमध्ये म्हणजेच क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटमध्ये CID मध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे. त्यामुळे ही संधी मिळवण्यासाठी इच्छुकांनी त्वरित अर्ज करणे आवश्यक आहे.
सीआयडीमधील होमगार्ड पदासाठी अर्जप्रक्रिया 1 मेपासून सुरु झाली आहे. ही भरती श्रेणी-ब तांत्रिक आणि इतर ट्रेडसाठी असून एकूण 28 पदांवर ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 15 मे 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याची संधी आहे.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून 12 वी (इंटरमिजिएट - 10+2) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संगणक वापरण्याचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे. याशिवाय, उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा.
दहावीची आणि बारावीची गुणपत्रिका
इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे (जर असतील तर)
निवास प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र
वैध ड्रायव्हिंग लायसन्स (LMV/HMV)
पासपोर्ट साइजचे 2 फोटो
होमगार्ड पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतन व सुविधा देण्यात येतील. यामध्ये दररोज मानधन व प्रशिक्षणानंतर सेवेत रुजू होण्याची संधी असेल.
ही भरती प्रक्रिया त्यांच्यासाठी उत्तम संधी आहे जे सरकारी सेवेत येण्याचे स्वप्न पाहतात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज लवकरात लवकर पाठवावा.