
Maharashtra CM Dashboard : विविध प्रकारच्या सरकारी योजना, सर्व गरजूंना लाभ मिळण्यासाठी प्रभावीपणे राबवणे आवश्यक असते. परंतु योजना राबवण्यात त्रुटी राहिल्यास लाभार्थ्यांना कोणताही फायदा होत नसल्याचे दिसते. परिणामी योजना अपयशी ठरते व सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना केली आहे. सरकारी योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही, यावर आता थेट मुख्यमंत्री स्वतः वॉच ठेवणार आहेत. मोबाईलवरून सर्व योजनांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर ते थेट वॉच ठेवणार आहेत.
विशेष म्हणजे, जिल्हानिहाय प्रगतीचा आढावा देखील घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकतेच सुसज्ज सीएम डॅशबोर्डचे उद्घाटन केले. सीएम डॅशबोर्डद्वारे सर्व योजनांची सद्यस्थिती मुख्यमंत्र्यांना थेट पाहता येणार आहे. तसेच मुख्यमंत्री जिल्हानिहाय प्रगतीचा आढावा देखील या माध्यमातून घेणार आहेत.
सीएम डॅशबोर्डमध्ये दररोज डेटा अपडेट होणार असल्यामुळे तातडीने सर्व माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचणार आहे. याशिवाय ॲम्बुलन्स (Ambulance) लाईव्ह ट्रॅक देखील करता येईल. गरज भासल्यास त्यातील डॉक्टर, चालक यांनाही फोन करता येणार आहे. या डॅशबोर्डद्वारे 'राईट टू सर्व्हिस'चाही दैनंदिन आढावा घेता येईल.
कोणती प्रकरणे अडकली, कोणती निकाली निघाली किंवा कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे आहेत हे देखील मुख्यमंत्र्यांना कळणार आहे. एकूणच राज्य आणि केंद्राच्या सर्व योजनांची प्रगती याद्वारे समजेल. अन्य कुठलेही डॅशबोर्ड असतील तरी त्याचा उगम या सीएम डॅशबोर्डवर असेल, असेही सांगितले जात आहे.
राज्य सरकारच्या विविध विभागांच्या 26 नव्या वेबसाईट सुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत. ही संकेतस्थळे दिव्यांग व्यक्तींसाठी अनुकूल आणि माहिती अधिकार सेवायुक्त आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.