Maharashtra Budget 2025: अजितदादांचा बजेट हा कविता, आकडे अन् भावनांचा खेळ; सामान्यांच्या पदरी निराशा; रोहित पवार संतापले

Vidhan Sabha Adhiveshan 2025: आजच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वाढवण्याबाबत काय निर्णय घेणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती. 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये न केल्यानं लाडक्या बहिणींची पदरी निराशा आली.
Maharashtra Budget 2025
Maharashtra Budget 2025Sarkarnama
Published on
Updated on

अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदा अकराव्यांदा राज्याचे बजेट मांडले. महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करीत विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या बजेटवर टीका करीत नाराजी व्यक्त केली.

अजितदादांनी मांडलेला अर्थसंकल्प हा फक्त कविता,आकडे आणि भावनांचा खेळ आहे,सामान्यांच्या पदरी निराशा पडली आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. आजच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वाढवण्याबाबत काय निर्णय घेणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती.

Maharashtra Budget 2025
ED Raid on Chaitanya Baghel: माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या घरी EDचा छापा; 5 हजार कोटीचा गैरव्यवहार

1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये न केल्यानं लाडक्या बहिणींची पदरी निराशा आली. अजित पवार यांनी योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे अशी माहिती दिली आहे. अजित पवार यांनी योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये प्रस्तावित आहे, अशी माहिती दिली. पण 2100 रुपये मिळणार की नाही, याबाबत स्पष्टपणे सांगितले नाही.

Maharashtra Budget 2025
UPSC Success Story: कुली नं 1: रेल्वे स्टेशनवरील फ्री Wi-Fi वापरुन बनला IAS
  • घरकुल योजनेत महाराष्ट्राकडून 50 हजारांची वाढ करण्यात आली आहे.

  • घरकुल योजनेतील घरांच्या छतावर सौर उर्जा केंद्र बसविणार येणार आहे.

  • ४५ हजार कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प आहे.

  • पालघर जिल्ह्यात ‘वाढवण बंदर’ विकसित करण्यात येणार आहे.

  • या प्रकल्पाचा एकूण खर्च 76 हजार 220 कोटी रुपये असून त्यात राज्य सरकाचा सहभाग 26 टक्के आहे

  • वाढवण बंदरामुळे सुमारे 300 दशलक्ष मेट्रीक टन वार्षिक मालहाताळणी क्षमता निर्माण होणार आहे.

  • जवाहरलाल नेहरु बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे.

  • सन 2030 पर्यंत नव्या बंदरातून मालवाहतूक सुरु होणे अपेक्षित आहे.

  • बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्‍या जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये होणार आहे.

  • मराठी भाषा विभागाला २२५ कोटी

  • 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषा सन्मान दिन साजरा करण्यात येणार

  • प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र हवामान केंद्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com