कंत्राटदाराकडून चुकीच्या पद्धतीनं रस्त्याचं काम, महापालिका काय कारवाई करणार?

Municipal corporation Kolhapur : चुकीच्या रिस्टोरेशन कामात ठेकेदाराला वाचवण्याचं काम, चर मारून अपघाताला निमंत्रण देण्याचा प्रताप,महापालिका काय कारवाई करणार?
Municipalcorporation Kolhapur
Municipal corporation KolhapurSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला रिस्टोरेशनचे काम करण्यात आले. मात्र हे काम चुकीच्या पद्धतीने झाले आहे. रिस्टोरेशनचे काम हे रस्त्याच्या पातळीवर झाले आहे, याबाबत फेब्रुवारी महिन्यात महापालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. पण ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने झालेले काम पुन्हा करण्याचे सोडून महासैनिक दरबार हॉल समोर सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी रस्त्यावर रेस्टोरेशन केलेल्या ठिकठिकाणी चर मारून पाण्याला वाट करून देण्यात दिली आहे. यामुळे दुचाकींच्या अपघातात निश्चित वाढ होणार आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर महापलिका कारवाई करणार का? त्याला पाठीशी घालणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

डिसेंबर 2023 मध्ये विभागीय कार्यालय क्र. 4 (ताराराणी मार्केट) यांच्या अखत्यारीत शासकिय विश्राम गृह, जलसंपदा विभाग, पितळी गणपती परिसरात रिस्टोरेशनचे काम झाले. काम सुरू असताना रिस्टोरेशन रस्त्याच्या मूळ पातळीवर होत नाही, याबाबत नागरिकांनी विभागीय कार्यालयाला तक्रार देऊनही या कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केले. महापालिकेच्या या भोंगळ कारभाराबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध आल्यानंतर सुस्त विभागीय कार्यालय जागे झाले आणि त्यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली.

Municipalcorporation Kolhapur
Satyajit Kadam News : '..त्यावेळी सतेज पाटलांनी काय दिवे लावले, हे सर्वांनी पाहिले आहे' ; सत्यजित कदमांची टीका!

प्रभाग क्रं 6,11,12 मधील रिस्टोरेशची कामे मंजूर अंदाजपत्रकातील सेस्पीफिकेशन प्रमाणे झाली नाहीत, मुळ रस्ता पातळीचे वर सदरचे काम झाल्याने रस्तेवरील पाण्याची निचरा होणार नाही. त्यामुळे हे काम मुळ रस्त्याच्या समपातळीत करावे, अशी सूचना महापालिकेने (Kolhapur Mahanagpalika) केली. तर सदरची दुरुस्ती न केल्यास आपले बिल थोपवून टेंडरमधील अटी व शर्तीनुसार कारवाई करणेत येईल, असा लेखी इशारा विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता यांनी 23 फेब्रुवारी च्या पत्राने दिला होता.

Municipalcorporation Kolhapur
PCMC News : ..नाही, तर मग, राज्य सरकारही कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या ; छावा संघटना आक्रमक

गेल्या तीन महिन्यात दुरुस्तीचे कोणतेही काम या ठिकाणी झालेले नाही. यंदा कोल्हापूरात अतिवृष्टी झाली. पाणी रिस्टोरेशनमधून वाहिन्यांऐवजी रस्त्यावरून वाहू लागले. आज देखील रिस्टोरेशनची दुरुस्ती झाली नाही. तर उलट पाणी जाण्यासाठी ठेकेदाराने रिस्टोरेशन जवळ चर मारली आहे. धैर्यप्रसाद हॉल पासून ते छावा चौक परिसरात चुकीच्या पद्धतीने चर मारली आहे. त्यामुळे अपघाताला निमंत्रण देणाऱ्या जागोजागी चर मारल्या आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर महापालिका (Municipal Corporation) कारवाई करणार का? का त्याला पाठीशी घालणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com