Elections of Cooperative Societies ...म्हणून पुन्हा एकदा सहकारी संस्थांच्या निवडणुका सहकार विभागाने पुढे ढकलल्या!

Cooperative Societies Elections Postponed : जाणून घ्या, यावेळी नेमकं कोणतं कारण पुढे करण्यात आलं आहे?, याआधी लोकसभा निवडणुकीमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
Voting
Voting Sarkarnama

Cooperatives department and Cooperative Societies Elections : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत आलं आहे. त्यानंतर आता राज्यात आगामी विधानसभा, विधानपरिषद निवडणुकांचे राजकीय पक्षांना वेध लागले आहे.

याशिवाय सहकारी संस्था विशेष करून बाजार समित्यांच्या निवडणुकांचीही घोषणा होणार असल्याने, राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनाही याची उत्सुकता होती. मात्र सहकार विभागाने पुन्हा एकदा या बाजार समितींच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

यामागे पावसाळ्याचा हंगाम हे कारण असल्याची माहिती समोर आली असून, पावसाचा हंगाम संपेपर्यंत म्हणजे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत या निवडणुका आता होणार नाहीत. त्यामुळे आता राज्यभरातील जवळपास 8305 सहकारी संस्थांची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे.

Voting
Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढेंच्या बदलीने दूध उत्पादक निराश, तर 'त्या' अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास!

राज्य सरकारने यापूर्वी निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्था आणि आतापर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या जवळपास 38 हजार 740 सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 मेपर्यंत स्थगिती दिली होती.

2024-25 या वर्षांत राज्यभराती 24,710 सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या कार्यालयाकडून शासनास प्राप्त झालेल्या अहवालानुसार समोर आली आहे.

यंदाच्या 2024 या वर्षात निवडणुकीसाठी 7 हजार 827 सहकारी संस्था पात्र ठरत असल्याने, या सर्व सहकारी संस्थांची निवडणूक सहकार विभागाला घेणे अनिवार्य आहे. परंतु आधी लोकसभा निवडणुकीमुळे आणि आता पावासाळ्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत.

Voting
Mumbai Metro Scam : यह तो 'ट्रेलर' है! IAS रुबल अग्रवाल यांनी मेट्रो अधिकाऱ्यांना खडसावलं...

यंदाच्या 2024 या वर्षात 7 हजार 827 सहकारी संस्था निवडणुकांसाठी पात्र ठरत असल्याने या सर्व 38 हजार 740 सहकारी संस्थांची निवडणूक सहकार विभागाला घ्यावी लागणार आहे. मात्र, आधी लोकसभा निवडणुकांचे कारण देत ह्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता, पावसाचे कारण देत ह्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सहकारी संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेकांनी तयारी करून उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत प्रवास केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने हा कार्यक्रम जैसे ते ठेवण्याचे आदेश सहकार प्रशासनाकडून मिळाले होते. मात्र निकालानंतर पुन्हा एकदा गाव गाड्याचं वातावरण राजकारणाने ढवळून निघणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com