Crime News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवतीचा पोलिस निरीक्षकाकडून विनयभंग; नागपुरातील खळबळजनक घटना

Dhananjay Sayre Crime News: या मुलीची धनंजय सायरे यांच्याशी ओळख झाल्यानंतर सायरे यांनी मुलीला फोन करुन, "मी अनेकांचे भवितव्य घडविले आहे, तू माझ्या बरोबर रहा, मी तुझे भविष्यदेखील उज्वल करून देतो," असं आमिष दाखवलं
Dhananjay Sayre
Dhananjay SayreSarkarnama

Nagpur Crime News: पोलिस खात्याला काळीमा फासणारे संतापजनक कृत्य अकोला (Akola) शहरातील खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांनी केलं आहे. सदर कृत्याबद्दल त्यांच्याविरुद्ध नागपूर येथील नंदनवन पोलिस ठाण्यात (Nandanvan Police Station) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय सायरे यांनी केलेल्या कृत्यामुळे अकोला पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे.

खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सायरे (Dhananjay Sayre) यांनी नागपुरातील (Nagpur) नंदनवन परिसरात राहणाऱ्या 22 वर्षीय युवतीचा विनयभंग केला आहे. पिडीत युवती ही यूपीएससीची (UPSC) तयारी करीत होती. या मुलीची धनंजय सायरे यांच्याशी ओळख झाल्यानंतर सायरे यांनी युवतीला फोन करुन, "मी अनेकांचे भवितव्य घडविले आहे, तू माझ्या बरोबर रहा, मी तुझे भविष्यदेखील उज्वल करून देतो, त्यासाठी मार्गदर्शन करतो" असं आमिष दाखवलं. सायरे यांचं फोनवरील सर्व संभाषण युवतीनेआपल्या आईला सांगितलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर पुन्हा सायरे यांनी 18 मेच्या संध्याकाळी सदर युवतीचा मोबाईल ट्रेस करत तिच्यापर्यंत पोहोचले. मुलीचा पाठलाग केल्यानंतर त्यांनी तिला सोबत राहण्याबाबत विचारणा केली, तिने नकार दिल्यानंतर त्यांनी तिला विनंतीदेखील केली. तरीही तिने नकार दिल्यानंतर मात्र सायरे यांनी जबरदस्ती करत युवतीचा हात पकडला आणि तिची छेड काढली.

Dhananjay Sayre
Gondia News: मध्यस्थी करणं जीवावर बेतलं! शिक्षक-मुख्याध्यापकाच्या भांडणात लिपिकाचा मृत्यू

या सर्व प्रकारानंतर पिडीत युवतीने नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा सायरे विरोधात भादवि कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या आरोपी सायरे पसार झाला आहे. तर आता सदर प्रकरणाचा सविस्तर तपास नंदनवन पोलिस करत आहेत. मात्र या झालेल्या सर्व प्रकारामुळे अकोला पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com