Gondia News: मध्यस्थी करणं जीवावर बेतलं! शिक्षक-मुख्याध्यापकाच्या भांडणात लिपिकाचा मृत्यू

Gondia Crime News:वादविवाद न करता सामंजस्यांनी प्रश्न मिटावेत या उद्देशाने बागडे यांनी मध्यस्थी केली. मात्र, खोब्रागडे याचा राग अनावर झाल्याने त्याने लाकडी दांड्याने मुख्याध्यापकांना मारण्याचा प्रयत्न केला.
Crime News
Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

मध्यस्थी करणं हे कसं जीवावर बेतलं, याचा प्रत्यय गोंदिया (Gondia) जिल्ह्यात आला. एका शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यातील वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या सेवानिवृत्त लिपिकाला आपला जीव गमवावा लागल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुकुंद बागडे (६०) असे (Mukund Bagde) मृत्यू झालेल्या लिपिकाचे नाव आहे.

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी येथे ही घटना घडली. सिद्धार्थ विद्यालयाचे संस्थापक आणि शिक्षकाचा वाद झाल्यानंतर मध्यस्थी करायला गेलेले बागडे यांना नाहक आपला जीव गमवावा लागला. आरोपी शिक्षकाच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. त्याला गोंदिया पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Crime News
Sharad Pawar ON PM Modi: पंतप्रधानांना आमच्या पक्षांची चिंता का? पवारांनी घेतला मोदींचा समाचार

काल (बुधवारी) सिद्धार्थ विद्यालयाच्या संस्थेची सभा आयोजित केली होती. संस्थेची सभा संपल्यानंतर शाळेतील शिक्षक हिरालाल खोब्रागडे (५२) यांनी अचानकपणे शाळेचे संस्थापक आणि मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम यांच्याशी शाब्दिक वाद घातला. वादविवाद न करता सामंजस्यांनी प्रश्न मिटावेत या उद्देशाने बागडे यांनी मध्यस्थी केली. मात्र, खोब्रागडे याचा राग अनावर झाल्याने त्याने लाकडी दांड्याने मुख्याध्यापकांना मारण्याचा प्रयत्न केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी सेवानिवृत्त लिपिक बागडे यांच्या डोक्यावर तो लाकडी दांडा लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बागडे यांना गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेची नोंद देवरी पोलिसांनी घेतली आहे. खोब्रागडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com