Delhi Income Tax Office : मोठी बातमी ! दिल्लीत इन्कम टॅक्स ऑफिसला आग

Delhi News : या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात इमारतीतील रहिवासी आगीतून बाहेर पडताना खिडकीच्या कठड्यावर आसरा घेताना दिसत आहेत.
Delhi Income Tax Office
Delhi Income Tax Office Sarkarnama
Published on
Updated on

Delhi Fire News : दिल्लीतील इन्कम टॅक्स विभागाच्या ऑफिसला मंगळवारी (ता. 14) आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग मोठ्या प्रमाणात असून ती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी फायरब्रिगेडच्या दहापेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यास अग्निशमन दलाचाही दुजोरा मिळाला आहे.

दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की आम्हाला दुपारी तीन वाजून सात मिनिटांनी इन्कम टॅक्सचे ऑफिस असलेल्या सीआर बिल्डिंगला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या एकूण 21 तुकड्या घटनास्थळी रवाना केल्या. तेथील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी स्थानिक पोलिसांनाही याबाबत कळवले आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

इन्कम टॅक्सचे ऑफिस असलेली इमारत जुन्या पोलिस मुख्यालयासमोर आहे. दरम्यान, या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात इमारतीतील रहिवासी आगीतून बाहेर पडताना खिडकीच्या कठड्यावर आसरा घेताना दिसत आहेत. जवानांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली केल्या.

Delhi Income Tax Office
Loksabha election 2024 : भाजपच्या संकटमोचकासमोरच कार्यकर्त्यांची धुसफूस; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी खबरदारीचा उपाय म्हणून इमारत तातडीने रिकामी केली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे. आगीचे कारण आणि किती प्रमाणात आग लागली याबाबतचा अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Delhi Income Tax Office
Sushma Andhare News : "राज ठाकरेंना मुंबई घाबरत असेल, मी नाही घाबरत", सुषमा अंधारेंनी ललकारलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com