IAS success story : पहिलीत असतानाच पितृछत्र हरपलं; अहोरात्र मेहनत करत रितेशने IAS पदाला घातली गवसणी

Ritesh Patel IAS : भारतीय प्रशासन सेवेत दाखल होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अनेक जण त्यासाठी अहोरात्र परिश्रम देखील घेत असतात. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या अनेक युवक असाच प्रयत्न करीत आहेत. त्यांना यश देखील मिळत आहे.
Ritesh Patel
Ritesh PatelSarkarnama
Published on
Updated on

Ritesh Patel Success Story : अनेकदा संकट आणि प्रतिकूल परिस्थिती लढायला शिकवते. धुळ्याच्या रितेश पटेल याच्याबाबत देखील असेच काहीसे घडले आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाचा आनंद आता गंगनात मावेनासा झाला आहे.

भारतीय प्रशासन सेवेत दाखल होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अनेक जण त्यासाठी अहोरात्र परिश्रम देखील घेत असतात. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या अनेक युवक असाच प्रयत्न करीत आहेत. त्यांना यश देखील मिळत आहे.

त्यामुळे धुळे जिल्ह्याचा नावलौकिक आता देशभर वाढू लागला आहे. यामध्ये श्रीतेश भूपेंद्र पटेल या युवकाची भर पडली आहे. श्रीतेश पहिलीत शिक्षण घेत असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबावर मोठी आपत्ती कोसळली. मात्र यातूनही तो खचला नाही.

Ritesh Patel
MPSC Recruitment 2025 : दिव्यांग उमेदवारांच्या भरती प्रक्रियेत मोठी अपडेट; 1 मे पासून नवे नियम लागू

प्राथमिक स्तरापासूनच त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. अहोरात्र मेहनत केली. त्यामुळे इयत्ता सातवीमध्ये त्याला शिष्यवृत्ती मिळाली. अभ्यासामध्ये तो सातत्याने पुढे राहिला. त्यामुळे शिक्षकांचाही तो आवडता विद्यार्थी बनला होता.

अभ्यासात एकाग्र होण्यामागे त्याची प्रेरणा अर्थातच आई मिनाक्षी पटेल या होत्या. मुलाऐवजी स्वत:लाच आयएएस व्हायचे आहे या जिद्दीने त्या झटून मुलाच्या मागे उभ्या राहिल्या. सातत्याने मुलाला प्रेरित करत राहिल्या.

श्रीतेश याने देखील आईचा आग्रह मोडला नाही. पदवीचे शिक्षण घेतल्यावर त्याने आपले लक्ष भारतीय प्रशासन सेवेत दाखल होण्यासाठी परीक्षा देण्याचे निश्चित केले. 2020 मध्ये त्याने या दृष्टीने अभ्यासाला सुरुवात केली. त्यासाठी अनेकांचे मार्गदर्शन केले. इंटरनेटच्या माध्यमातून विविध टिप्स कलेक्ट केल्या. आपला अभ्यास अशा पद्धतीने त्याने सुरू ठेवला.

श्रीतेश पटेल याने तीनदा भारतीय प्रशासन सेवेतील परीक्षा दिली मात्र सुरुवातीचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी झाले अयशस्वी होऊ नये त्याने न खचता अधिक जोमाने आणि अधिक परिश्रम घेत आपले ध्येय कायम ठेवले. अखेर 2025 मध्ये तो यशस्वी झाला आहे. भारतीय प्रशासन सेवेत दाखल होण्याची त्याची संधी सत्यात उतरणार असल्याने त्याचे कुटुंबीय सध्या खूप आनंदात आहे. त्यांचा आनंद अक्षरशः गगणात मावेनासा झाला आहे.

Ritesh Patel
Pahalgam Terror Attack : नागपूर, मुंबई अन् पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांना राज्य सरकारनं शोधलंच; 48 तासांनंतर भारतात राहण्यास बंदी!

श्रीतेशने केमिकल सायन्स या विषयात बी टेक ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर थेट आयएएस परीक्षेची तयारी सुरू केली. स्वतः जलतरण प्रशिक्षक असलेल्या मीनाक्षी पटेल यांनी आपल्या मुलाला त्यासाठी सतत प्रेरणा दिली. आयएएस परीक्षेत त्याने मानववंशशास्त्र (अँथ्रोपोनॉलॉजी) हा विषय घेतला होता. सबंध भारतात तो 746 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

बालपणीच पितृछत्र हरपल्याने एकाकी म्हणून त्याने निराशा न होता केलेले हे प्रयत्न त्याचे आप्तस्वकीय आणि परिसरातील नागरिकांसाठीही चर्चेचा विषय ठरले आहे. त्याच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. आई मीनाक्षी पटेल हिने सतत उत्साही राहून त्याच्या यशात आणि परीक्षेत मुला एवढेच परिश्रम घेतले आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com