MPSC Recruitment 2025 : दिव्यांग उमेदवारांच्या भरती प्रक्रियेत मोठी अपडेट; 1 मे पासून नवे नियम लागू

MPSC Recruitment 2025 :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रकियेत 1 मे 2025 पासून सर्व दिव्यांग उमेदवारांना केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवर वितरित होणारे दिव्यांग सर्टिफिकेट आणि वैश्विक ओळखपत्र (UDID कार्ड) अनिवार्य करण्यात आलं आहे.
MPSC Recruitment 2025, UDID Card
MPSC Recruitment 2025, UDID CardSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 25 Apr : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रकियेत 1 मे 2025 पासून सर्व दिव्यांग उमेदवारांना केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवर वितरित होणारे दिव्यांग सर्टिफिकेट आणि वैश्विक ओळखपत्र (UDID कार्ड) अनिवार्य करण्यात आलं आहे.

हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या 27 जून 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या निर्णयानुसार आता 'एमपीएससी'च्या सर्व भरती प्रक्रियेत दिव्यांग सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे.

MPSC Recruitment 2025, UDID Card
Terror alert Mumbai coast : महाराष्ट्र पोलिस दलात वेगवान हालचाली, समुद्र किनारपट्टीलगत 'अलर्ट मोड'वर; 'ड्रोन'च्या नजरेसह सागरी गस्तीत वाढ

महत्वाची बाब म्हणजे 'एमपीएससी'च्या ऑनलाईन अर्जप्रणालीत दिव्यांग उमेदवारांना त्यांच्या खात्यात युडीआयडी नंबर नोंदविण्याची आणि स्वावलंबन पोर्टलवरून वैधता मिळविण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यानुसार आता उमेदवारांकडे दिव्यांग प्रमाणपत्र आणि UDID कार्ड असेल तर त्याची माहिती खात्यात नोंदवणे अनिवार्य आहे. मात्र, ज्यांच्याकडे दिव्यांग सर्टिफिकेट नाही. मात्र, राज्य शासनाच्या एसएडीएम पोर्टलवरुन वितरित केलेले दिव्यांग सर्टिफिकेट आहे.

अशा उमेदवारांना एसएडीएम सर्टिफिकेटसह वैश्विक आयकार्डसाठी नोंदणी केलेला क्रमांक अनिवार्य असणार आहे. दरम्यान, उमेदवाराचे नाव, दिव्यांगत्वाचा प्रकार याबाबतीचा तपशील तपासूनच माहिती वैध ठरवली जाणार आहे.

MPSC Recruitment 2025, UDID Card
Success Story: 25 वर्षांपूर्वी कचऱ्याच्या पेटीत सापडली होती... अमरावतीच्या शंकरबाबांची लेक झाली कलेक्टर ऑफिसमध्ये अधिकारी

खात्यातील आणि UDID कार्डवरील जन्म तारीख एकच असणं आवश्यक आहे. तर आता कोणत्याही जाहिरातीसाठी अर्ज करताना दिव्यांग तपशील वैध असल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाहीत, त्यामुळे उमेदवारांनी ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घेण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com