Rashmi Shukla News : पोलिस अधिकाऱ्यांच्या चमकोगिरीला रश्मी शुक्लांचा लगाम!

DGP Rashmi Shukla warns police : अतिउत्साही पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर रश्मी शुक्लांच्या 'या' आदेशामुळे शिस्तीचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.
Rashmi Shukla
Rashmi Shuklasarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Police News : बदली, निवृत्तीनिमित्त होणारे सत्कार, फेटे याचे सोशल मीडियावर फोटो टाकून चमकाेगिरी केली जाते. या पोलिस अधिकाऱ्यांच्या चमकोगिरीला महासंचालक रश्मी शुक्ला ( Rashmi Shukla ) यांनी चाप लावला आहे. यानिमित्ताने शुक्लांनी पोलिस विभागात वाढणाऱ्या बेशिस्तीवर नेमके बोट ठेवले. ( DGP Rashmi Shukla warns police personnel against organising farewell for transfering officers )

Rashmi Shukla
Agricultural University : कृषी विद्यापीठाने राज्यपालांना केले सेन्सॉर; काय आहे प्रकरण?

अनेक पोलिस अधिकारी शिस्तीच्या बाहेर जाऊन अनेक समारंभांना हजेरी लावतात. बदली, निवृत्ती तसेच वाढदिवसानिमित्त नागरिकांकडून आणि सहकाऱ्यांकडून सत्कार समारंभ घडविले जातात. त्यात गाजावाजा करीत फेटे बांधणे, केक कापणे आणि सत्कार स्वीकारणे, असे प्रकार सर्रास होऊ लागले आहेत. या प्रकारांची राज्याच्या नव्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांनी अतिशय गंभीर दखल घेतली आहे. यावर चाप लावण्यासाठी त्यांनी एक परिपत्रकच काढले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पत्रकात रश्मी शुक्लांनी म्हटलं, "राज्य पोलिस दलातील विविध दर्जाच्या अधिकारी अंमलदारांना शासनाच्या नियमानुसार प्रशासकीय कारणास्तव होणाऱ्या बदल्या आणि अन्य उपक्रमांमध्ये विविध पोलिस ठाणे आणि शाखांमध्ये निरोप समारंभसारखे प्रकार होतात. त्यात गणवेश घातलेले अधिकारी विविध रंगांचे फेटे बांधणे, फुलांचा वर्षाव करणे, गुच्छ आणि सत्कार स्वीकारणे आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांना दोरीने ओढत नेणे, असे प्रकार होतात. त्याची गंभीर दखल घेऊन हे सर्व प्रकार पोलिस शिस्तीच्या आणि प्रमाणित कार्यपद्धतीला अनुसरून नाही."

Rashmi Shukla
Geeta Shejval : सरकारी रिव्हाॅल्व्हरचा गैरवापर, नगरच्या गीता शेजवळ, संकेत गायकवाड निलंबित

पोलिस दलात अनेक अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कार्यकक्षेबाहेर जाऊन नागरिक, सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांची संपर्क ठेवतात. यातून पोलिसांचा समाज व्यवस्थेवरील दबाव आणि प्रभाव कमी होतो. असामाजिक तत्त्वांवर पोलिसांचा धाक असला पाहिजे. तो कायम राहण्यासाठी पोलिस विभागाने काही नियम आणि शिस्त निश्चित केली आहेत. या सर्वांचे त्यात उल्लंघन होताना दिसते. हे पोलिस दलाच्या प्रतिष्ठेसाठी योग्य नसल्याचे मत अनेकदा व्यक्त झाले आहे. महानिरीक्षक शुक्ला यांनी नेमके यावर बोट ठेवले आहे. त्यामुळे पोलिसांचा हा नवा आदेश चर्चेचा विषय ठरणार आहे. काही अतिउत्साही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर या आदेशामुळे शिस्तीचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.

Rashmi Shukla
UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 120 जागांसाठी भरती; जाणून घ्या डिटेल्स

महासंचालक शुक्लांच्या नवीन आदेशानुसार यापुढे असे प्रकार घडल्यास ते शिस्तभंगाचे ठरणार आहे. असे कार्यक्रम यापुढे करता येणार नाहीत. तसे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. पोलिस दलातील पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिस दलात स्वागत, सत्कार फेटे बांधणे, यापासून तर अनेक प्रकारांना चाप बसणार आहे. त्यामुळे हा आदेश चर्चेचा विषय ठरला आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Rashmi Shukla
Raigad Collector : रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली; किसन जावळे यांची नियुक्ती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com