Raigad Collector : रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली; किसन जावळे यांची नियुक्ती

IAS Officers Transfered : डॉ. योगेश म्हसे यांच्या अचानक बदलीमुळे आश्चर्य
Kisan Jawale
Kisan JawaleSarkarnama
Published on
Updated on

Raigad News :

रायगड जिल्ह्यासाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचवेळी डॉ. म्हसे यांच्या जागी किसन जावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे सत्र सध्या सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून डॉ. म्हसे यांची बदली केल्याचे सांगितले जाते.

Kisan Jawale
Loksabha Election 2024 : गावबंदीच्या बॅनरवरून दीपक केसरकर संतापले; राणे समर्थक 'या' आमदारावर घसरले

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात महायुती सरकारकडून बदल्यांचे (IAS Transfer) सत्र मोठ्या प्रमाणावर आहे. मर्जीतील अधिकारी आणण्याचा खटाटोप राज्यातील सत्ताधारी पक्षातील आमदार व मंत्री करत असल्याचीही चर्चा आहे. त्याचाच भाग म्हणून रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे पाटील (Dr Yogesh Mhase Patil) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी कोकण आयुक्त कार्यालयात असणारे किसन जावळे (Kisan Jawale) यांची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे. अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी डॉ. योगेश म्हसे यांच्या बदलीचे पत्र काढले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे डॉ. योगे म्हसे यांनी गेल्या वर्षी 23 जानेवारी रोजी रायगडचा (Raigad District) पदभार स्वीकारला होता. म्हणजे अवघ्या 13 महिन्यांतच त्यांची बदली करण्यात आली आहे. एवढ्या अल्प काळात जिल्हाधिकाऱ्यांची बदली केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही.

(Edited by Avinash Chandane)

R

Kisan Jawale
Raigad Politics : शरद पवारांची पॉवरफुल खेळी; सुनील तटकरेंच्या विरोधात भावाला ताकद देत दिली मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com