ED action on IAS IPS : देशातील IAS-IPS हादरले; ‘ईडी’कडून एकाचवेळी तब्बल 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

ED’s Recommendation to Chhattisgarh Government : प्रशासकीय आदेशांच्या माध्यमातून कोळसा लेव्हीमध्ये अनियमितता केल्याचे आढळून आले आहे.
"ED recommends strict action against IAS and IPS officers involved in the Chhattisgarh coal levy scam."
"ED recommends strict action against IAS and IPS officers involved in the Chhattisgarh coal levy scam."Sarkarnama
Published on
Updated on

IAS IPS corruption : सक्तवसुली संचालनालयाने एका घोटाळ्याप्रकरणी एकाचवेळी तब्बल दहा आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली आहे. त्यामुळे देशातील प्रशासनात खळबळ उडाली आहे. अशाप्रकारे ईडीकडून एकाचवेळी दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांखाली कारवाईची शिफारस करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

छत्तीसगढमधील तब्बल 570 कोटींच्या हायप्रोफाईल कोळसा घोटाळा प्रकरणात ईडीने ही शिफारस केली आहे. भ्रष्टाचारविरोधी कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. छत्तीसगढचे मुख्य सचिव अमिताभ जैन आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे ईडीने ही शिफारस पाठविली आहे. त्यामध्ये संपूर्ण तपासाची माहितीही देण्यात आली आहे.

प्रशासकीय आदेशांच्या माध्यमातून कोळसा लेव्हीमध्ये अनियमितता केल्याचे आढळून आले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, ऑनलाईन कोळसा परवाने ऑफलाईन करून अवैधपणे लेव्ही वसुली करण्यात आली. 15 जुलै 2020 मध्ये तत्कालीन खनिज संचालक आएएस समीर विश्नोई यांनी आदेश दिला होता. त्यानुसार कोळसा ट्रेडर्सकडून अवैध वसुलीची प्रक्रिया सुरू झाली.

"ED recommends strict action against IAS and IPS officers involved in the Chhattisgarh coal levy scam."
Election petition : कोर्टाची भाजप सरकारला चपराक; सत्ताधारी पक्षाशी संबंधित निवडणूक याचिकेवर 5 वर्षांत अन् इतरांसाठी 5 महिन्यांत निर्णय…

घोटाळ्यातील प्रमुख आरोपी उद्योजक सूर्यकांत तिवारी यांचे नाव घेतले जात आहे. त्यांच्यासह आयएएस अधिकारी विश्नोई, रानू साहू आणि सौम्या चौरासिया यांचीही नावे समोर येत आहेत. चौरासिया या तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उपसचिव होत्या. या अधिकाऱ्यांना जानेवारी 2024 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अटक झाली होती. सध्या ते जामिनावर तुरूंगातून बाहेर आहेत.

"ED recommends strict action against IAS and IPS officers involved in the Chhattisgarh coal levy scam."
Ravindra Chavan News : ओला दुष्काळाच्या प्रश्नावर भाजप प्रदेशाध्यक्षांचा काढता पाय; एका शब्दांत दिलं उत्तर...   

ईडीने चौकशी अहवालात म्हटले आहे की, संपूर्ण घोटाळा नियोजनबध्द होता. कोळसा परवान्यांच्या दुरूपयोग करून मोठी रक्कम वसूल करण्यात आली. अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये समन्वय ठेवून एक मोठी साखळी निर्माण करण्यात आली होती. त्याअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. या घोटाळ्यात वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला असून त्यांच्याकडून जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन केल्याचेही ईडीने म्हटले आहे. ईडीच्या या शिफारशीनंतर आता सरकार काय कारवाई करणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com