Social Media : कर्मचाऱ्यांनो सोशल मीडिया जपून वापरा, शासनाचं तुमच्यावर लक्षए! सरकारच्या 'या' गाईडलाईन्स जरुर वाचा

Social Media : सध्याच्या डिजीटल युगात सोशल मिडियाचा वापर माहितीचं आदान-प्रदान करण्यासाठी, समन्वय, संवाद साधण्यासाठी तसंच लोकसहभाग वाढविण्यासाठी करण्यात येतो.
Social Media
Social Media
Published on
Updated on

Social Media : सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळं सोशल मीडियाचा वापरही प्रत्येकजण करताना दिसतो. केवळ व्यक्त होण्यासाठीच नव्हे तर फॉलोवर्स वाढवण्यासाठी आणि मित्रमंडळींशी कनेक्ट राहण्यासाठी लोक धडपडताना दिसतात. यामध्ये मग विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, महिला, पुरुष किंवा सरकारी कर्मचारी देखील दूर नाही. पण महाराष्ट्र सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता हा सोशल मीडिया जपून वापरावा लागणार आहे. कारण शासनाचं तुमच्यावर लक्ष आहे. त्यामुळं राज्य शासनानं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नव्या गाईडलान्स आणल्या आहेत. याबाबत सामान्य प्रशासन विभागानं एक परिपत्रक काढलं आहे.

Social Media
Eknath Shinde: "मोदी काल बोलले अन् आज खात्मा झाला..."; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

या परिपत्रकानुसार, शासकीय कर्मचा-यांच्या वर्तणुकीबाबत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ तयार करण्यात आले आहेत. हे नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडियाच्या वापराबाबतही लागू होतात. वर्तणूक नियमांचा भंग केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र ठरतो. या पार्श्वभूमीवर सोशल मिडियाच्या वापराबाबत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. या मार्गदर्शक सूचना अधिकारी आणि कर्मचारी सर्वांना लागू असणार आहेत.

Social Media
Ola-Uber: ओला-उबरला आता सरकारी अ‍ॅपचं आव्हान! रिक्षा-टॅक्सी, बाईक सेवा सुरु होणार; मराठी तरुणांना रोजगाराची नवी संधी

अशा आहेत गाईडलान्स

१) महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी/कर्मचारी (प्रतिनियुक्तीने तसेच करारपध्दतीने, बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांसह) तसंच स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी/कर्मचारी (प्रतिनियुक्तीने तसेच करारपध्दतीने, बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचा-यांसह)

२) राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलिकडच्या धोरणाबर किंवा कृतीवर प्रतिकूल टीका करु नये.

३) शासकीय कर्मचाऱ्याने सोशल मिडीयाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक व जबाबदारीने करावा.

४) शासकीय कर्मचाऱ्याने त्याचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मिडिया खाते (अकाऊंट) हे दोन्ही स्वतंत्र ठेवावेत.

५) केंद्र/राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट, अॅप, इ. चा वापर करु नये.

६) शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस सक्षम प्राधिकान्याच्या मान्यतेने शासकीय योजना, उपक्रम इत्यादींच्या प्रसार व प्रचारासाठी तसेच लोकसहभागाकरीता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचा वापर करता येईल.

७) कार्यालयांतर्गत कामकाजाबाबत समन्वय/संपर्क साधण्यासाठी व्हॉटस्अॅप, टेलिग्राम, इ. मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल.

८) शासनाच्या/विभागाच्या योजना/ उपक्रम यांच्या यशस्विततेच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांनी सांधिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मिडियावर मजकूर लिहीता येईल मात्र त्यामुळे स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावो.

९) अधिकान्यांनी केलेल्या वैशिष्टयपूर्ण शासकीय कामाबाबत मजकूर पोस्ट करता येईल. मात्र, त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

१०) वेक्तिक सोशल मिडिया अकाऊंटवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता, आपल्या शासकीय पदनामाचा, लोगो, वदर्दी/ गणवेष तसेच शासकीय मालमत्ता जसे की वाहन, इमारत, इत्यादींचा वापर फोटो/ रिल्स/व्हीडीओ अपलोड करतांना टाळावा.

११) आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानीकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर, इ. शेअर/अपलोड/फॉरवर्ड करु नयेत.

१२) प्राधिकृत केल्याशिवाय तसेच पूर्व मंजूरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज, शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्रे, अंशतः तसेच पूर्ण स्वरुपात शेअर/अपलोड/फॉरवर्ड करु नयेत.

१४) ज्या कर्मचाऱ्याकडून उपरोक्त मार्गदर्शक सूचनांचा भंग होईल त्याचेवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल.

१३) बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मिडिया अकाऊंट योग्य प्रकारे हस्तांतरीत करावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com