GST 3.0 : GSTमध्ये आणखी सुधारणा होणार! 2.0 नंतर आता पुढे काय? अर्थमंत्री सीतारमन यांनी सांगितला 3.0चा प्लॅन

GST 3.0 : जीएसटी परिषदेनं दोन दिवसांपूर्वी जीएसटीमध्ये मोठी सुधारणा केली. त्यानुसार, व्यवसाय अन् ग्राहकांसाठी सोपी दोन स्तरीय कर रचना जाहीर केली आहे. येत्या 22 सप्टेंबरपासून ही लागू होणार आहे.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanSarkarnama
Published on
Updated on

GST 3.0 : भारताच्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीमध्ये केंद्र सरकारनं दोनच दिवसांपूर्वी ऐतिहासिक सुधारणा जाहीर केली. यामध्ये केवळ दोनच स्लॅब शिल्लक ठेवले आहेत, तर चार स्लॅब रद्द करण्यात आली आहे. व्यवसायिक आणि ग्राहक या दोघांच्या सोयीसाठी आता केवळ दोनच स्लॅबची सोपी कर रचना करण्यात आल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितलं होतं.

येत्या २२ सप्टेंबरपासून ही नवी कर रचना देशभरात लागू होणार आहे. या कर रचनेचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन भाषण करतानाच दिले होते. दरम्यान, आज पुन्हा एकदा अर्थमंत्र्यांनी जीएसटीत तिसरी सुधारणार आणण्याचे संकेत दिले आहेत.

Nirmala Sitharaman
IAS, IPS अधिकाऱ्यांना मंत्री निलंबित, बडतर्फ करु शकतात का? नियम काय आहे?

इंडिया टुडेशी एका विशेष कार्यक्रमात बोलताना सीतारमण यांनी स्पष्ट केलं की, "2017 मध्ये सादर केलेला जीएसटी 1.0 हा देशाला 'एक राष्ट्र, एक कर' अंतर्गत एकत्रित करण्याबद्दल होता. त्यानंतर जीएसटी 2.0 आला जो कराच्या सुटसुटीतपणावर लक्ष केंद्रित करतो त्यानंतर सरकार भविष्यातील जीएसटी 3.0 आणखी सुधारणा आणू शकते" सीतारमन यांच्या या विधानामुळं आता भविष्यात जीएसटीत आणखी सुधारणा होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

Nirmala Sitharaman
Amol Mitkari: अजित पवारांशी वाद घालणाऱ्या 'त्या' महिला IPS अधिकाऱ्याचं 'जात प्रमाणपत्र' तपासून घ्या; अमोल मिटकरींचं थेट UPSC ला पत्र

सीतारमण पुढे म्हणाल्या की, जेव्हा जीएसटी पहिल्यांदा लागू करण्यात आला, तेव्हा तो गेम-चेंजर ठरणार म्हणून त्याचं स्वागत करण्यात आलं. राज्य आणि केंद्रीय करांच्या पॅचवर्कला एकाच देशव्यापी प्रणालीनं बदलून टाकलं. जीएसटी 1.0 हे एकतेच्या दिशेने एक पाऊल होतं. आता, जीएसटी 2.0 फक्त दोन स्लॅबसह कर रचना सुलभ करण्याचं आपल्याला आश्वासन देतो. कर रचनेतील गुंतागुंत कमी करुन आणि त्याची अंमलबजावणी सोपी करतं. सरकारला आशा आहे की, या बदलामुळं पारदर्शकता वाढेल अन् व्यवसाय करण्याची सुलभता वाढेल तसंच सामान्य नागरिकांवरील कराचं ओझंही कमी होईल.

लोकांसाठी कोणते बदल?

सरकार म्हणतं की, आम्ही सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीयांवर लक्ष केंद्रित केलं आहे. मूलभूत गरजांवर सर्वात कमी दरानं कर आकारला जाईल, तर लक्झरी वस्तूंवर जास्त कर आकारला जाईल. उदाहरणार्थ, मीठ आणि साखरेचा दर हा समान राहील. पण साखरयुक्त पेये आणि जास्त साखर असलेल्या उत्पादनांवर वेगवेगळे कर आकारले जातील. या नव्या कर रचनेमुळं शिक्षणातही स्पष्टता दिसेल, नियमित शालेय शिक्षण करमुक्त राहील. पण व्यावसायिक कोचिंग सेंटरना अशी समान सूट मिळणार नाही.

व्यावसायिकांना आवाहन

सीतारमण यांनी यावेळी व्यवसायांनी आवाहन केलं की त्यांनी कमी करांचा फायदा ग्राहकांना दिला पाहिजे, असं होतंय का नाही? हे 22 सप्टेंबरनंतर आमच्यासाठी एक मोठं दक्षता कार्य असणार आहे. कमी केलेले दर लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यासाठी खासगीसह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवरही बारकाईनं लक्ष ठेवलं जाईल, असंही सीतारमण म्हणाल्या.

जीएसटी 3.0 कडे वाटचाल

दोन-स्लॅबची कर प्रणाली ही अत्यंत आवश्यक असलेल्या सवलती आपल्याला देते. यानंतर अर्थमंत्र्यांनी पुढील टप्प्याचे संकेतही दिले आहेत. जीएसटी 3.0. या पुढच्या टप्प्यात जीएसटी 2.0 मध्ये दिलेला सुटसुटीतपणा कायम ठेवला जाईल आणि नवी सुधारणा केली जाईल. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, GST 3.0 मध्ये स्थिरता, निष्पक्षता आणि सुरळीत अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे. लहान व्यापाऱ्यांबाबत गोंधळ निर्माण न होता किंवा त्यांच्यावर ओझं न टाकता कर रचना सुरळीत ठेवणं हे यामागील उद्दिष्ट असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com