How to Track a Stolen Mobile : केंद्र सरकार सरसावले लोकांचे मोबाईल मिळवून द्यायला

Track Your Stolen Mobile Phone : आता अत्यावश्यक बनलेला मोबाईल जर हरवला किंवा चोरीला गेला तर काय करायचं. तर आता मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर पोलिस ठाण्यात जाऊन हेलपाटे घालण्याची गरज नाही.
Track Your Stolen Mobile Phone
Track Your Stolen Mobile PhoneSarkarnama

How To Find The Lost Mobile : रोजच्या आयुष्यात आपण कुणीच मोबाईल शिवाय राहु शकत नाही. आता अत्यावश्यक बनलेला मोबाईल जर हरवला किंवा चोरीला गेला तर काय करायचं. तर आता मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर पोलिस ठाण्यात जाऊन हेलपाटे घालण्याची गरज नाही.

कारण आता केंद्र सरकारने (Central Government) मागच्या वर्षी सुरु केलेल्या वेबसाईटवर हरवलेल्या मोबाईलचा 'आयएमईआय' नंबर टाकला की, त्याची तक्रार केंद्र सरकारच्या यंत्रणा काम करायला लागतात आणि हरवलेला मोबाईल ट्रेस झाला की तुम्ही ज्या भागात राहता तेथील पोलिस ठाण्यात त्या बाबतची माहिती पाठविली जाते. त्या माध्यमातून तक्रारदाराला त्याचा मोबाईल सहज मिळू शकतो.

या यंत्रणेमुळे गेल्या एक वर्षात देशात 81 हजार 861 मोबाईल परत मिळण्यास मदत झाली. यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra) तिसऱ्या क्रमांकावर आहे तर पहिल्या क्रमांकावर कर्नाटक तर दुसऱ्या क्रमांकावर तेलंगणा आहे.

एक वर्षात महाराष्ट्रातील 15 हजार 426 नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळाले आहेत. तर कर्नाटकमध्ये (Karnataka) 35 हजार 945 मोबाईल आणि तेलंगणामध्ये (Telangana) 30 हजार 49 मोबाईल नागरिकांना परत मिळाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कशी काम करते ही यंत्रणा

गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने 'सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर' www.ceri.gov.in ही वेबसाईट 17 मे रोजी सुरु केली होती. या वेबसाईटवरून नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल सहज परत मिळण्याची व्यवस्था केली आहे.

केंद्र सरकारच्या अधिकारात असणाऱ्या सी-डॉटने (CDOT) याबाबतची टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. सगळ्यात आधी 2022 मध्ये कर्नाटकमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला. तो यशस्वी झाल्यामुळे केंद्र सरकारने संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.

Track Your Stolen Mobile Phone
Pune Interview News : पुणे, मुंबईवरून गोव्यातील राजकारण तापले; इंटरव्ह्यूवरून आमदार विजय सरदेसाई संतापले

अशी आहे मोबाईल परत मिळण्याची यंत्रणा

मोबाईल गहाळ झाल्यावर नागरिकांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार द्यायची. त्याच्या आधारे त्यांना गहाळ झालेल्या मोबाईलमधील सीम कार्डचे डुप्लिकेट सीम मोबाईल कंपनीकडून मिळते. ते ॲक्टिव्हेट झाल्यावर खात्रीसाठी त्यावर ओटीपी येतो. त्याच्या आधारे www.ceri.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवताना हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक नोंदविला जातो.

  • हरवलेल्या मोबाईल सुरू झाल्यास त्याचे नोटिफिकेशन तक्रार केलेल्या संकेतस्थळावर येते. सर्व्हरद्वारे त्या मोबाईलचे लोकेशन तक्रारदार राहत असलेल्या भागातील पोलिस ठाण्यात पाठविले जातात. तसेच त्याबाबत ज्याचा मोबाईल गहाळ झाला आहे, त्यांनाही कळविले जाते.

  • पोलिसांच्या मदतीने हरवलेला मोबाईल परत मिळण्यास मदत होते.

  • हरवलेल्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक कायमस्वरूपी ब्लॉक करण्याचाही ‘ऑप्शन’ या वेबसाईटवर नागरिकांना उपलब्ध आहे

  • मोबाईल गहाळ होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या www.ceri.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून नागरिकांना सहज मोबाईल उपलब्ध होऊ शकतो.

Track Your Stolen Mobile Phone
Pune Interview News : पुणे, मुंबईवरून गोव्यातील राजकारण तापले; इंटरव्ह्यूवरून आमदार विजय सरदेसाई संतापले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com