Pune Interview News : पुणे, मुंबईवरून गोव्यातील राजकारण तापले; इंटरव्ह्यूवरून आमदार विजय सरदेसाई संतापले

Political News : गोव्यातील नागरिकांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आक्रमक झाले आहेत.
job
job sarkarnaama

Mumbai News : गोव्याची ओळख औषध निर्मिती उद्योगात एक अग्रेसर राज्य अशी आहे. गोव्यातील दोन फार्मा कंपन्यांच्या नोकरभरतीसाठी मुंबई, पुण्यात मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. यावरुन गोव्यातील वातावरण आता चांगलेच तापले आहे. पुण्या मुंबईत इंटरव्ह्यू होत असल्याने गोव्यातील बेरोजगार युवकांना डावलले जात असल्याची भावना झाली आहे.

मुंबई, पुण्यात इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आल्याने याप्रकरणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी रान उठवले आहे. येथील सत्ताधारी भाजपवर त्यांनी टीका केली. हा प्रकार म्हणजे गोव्यातील नागरिकांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आक्रमक झाले आहेत. यावर त्यांनी आक्षेप घेत कंपनी रोजगारापासून डावलत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे येत्या काळात वातावरण तापणार आहे.

बोईसर येथे गोव्यातील इंडोको रिमेडिज फार्मा कंपनीच्या विविध पदाच्या नोकरभरतीसाठी 24 आणि 25 मे रोजी इंटरव्यूहवरून आयोजित करण्यात आल्याची जाहिरात कंपनीने प्रसिद्ध केली. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai ) यांनी यावर आक्षेप घेत कंपनी गोव्यातील युवकांना रोजगारापासून डावलत असल्याचा आरोप केला.

job
Prashant Kishor News : प्रशांत किशोर भडकले, काँग्रेसचा पराभव होणार म्हटल्याचे व्हिडिओ दाखवण्याचे दिले चॅलेंज

उत्तर गोवा लोकसभा उमेदवार मनोज परब यांनी देखील या प्रकारावरुन भाजप सरकारवर टीका केली. राज्यातील फार्मा कंपन्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भाजप सरकारने परप्रांतीयांना नोकऱ्या विकल्या आहेत. स्थानिकांना नोकऱ्यांसाठी आपल्याकडे बळकट आरक्षण धोरण नाही, अशा शब्दांत परब यांनी टीका केली.

याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी हस्तक्षेप करुन गोवेकरांसाठी उभे राहण्याची विनंती केली. राज्यातील उद्योगांपासून स्थानिकांना फायदा होणार नसेल तर, त्यांचा येथे असण्याचा उपयोग काय? असा सवाल देखील आमदार सरदेसाई यांनी उपस्थित केला.

कारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मुलाखती रद्द

मुंबईत मुलाखती घेण्यावरुन झालेल्या वादानंतर अखेर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करत कंपनीला इंटरव्यूह रद्द करण्यास भाग पाडले. कंपनीने तांत्रिक कारण देत बुधवारी सायंकाळी ही इंटरव्यूह रद्द केल्याचे जाहीर केले.

दुसऱ्या एका कंपनीची पुण्यात इंटरव्यूह

दुसऱ्या एका कंपनीच्या नोकरीभरतीसाठी पुण्यात इंटरव्यूह होत असल्याची जाहिरात समोर आली. इनक्युब इथिकल्स या फार्मा कंपनीत दोन पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यासाठी पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये येत्या 26 मे रोजी मुलाखती होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. याबाबत आमदार विजय सरदेसाई यांनी पुन्हा सरकार आणि खासगी कंपन्यांवर निशाना साधला आहे.

job
Pune Car Accident News: पुणे अपघातप्रकरणी आरोपीवर पुढील खटला कसा चालवणार? आयुक्तांनी स्पष्टचं सांगितलं

भारताच्या औषध उत्पादनात गोव्यातील फार्मा कंपन्या अंदाजे 10 टक्के योगदान देत असल्याचे समजते.औषध निर्मिती उद्योगात गोवा एक अग्रेसर राज्य आहे. एका अहवालानुसार, राज्यातील फार्मा उद्योगाचे अंदाजे वार्षिक उत्पन्न 7,500 कोटी पेक्षा जास्त आहे. उद्योगात दरवर्षी सुमारे 15 टक्के वाढ नोंदवली जात आहे.

(Edited By : Sachin Wagmare )

job
Mumbai-Goa Highway : मनसेच्या जागर यात्रेपूर्वीच रवींद्र चव्हाणांची मोठी घोषणा ; भाजपाचा कार्यकर्ता आहे.., कर्तव्याला चुकणार नाही…

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com