

महायुती सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील प्रशासकीय पातळीवर मोठी उलथापालथ सुरू आहे. गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून राज्यात वरिष्ठ आयपीएस आणि आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या सातत्याने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने पुन्हा एकदा पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
मंगळवार, दिनांक 18 नोव्हेंबरला राज्य सरकारकडून या पाच अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीतच अनेक विभागांमध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. शिक्षण, कृषी, जलसंधारण आणि आदिवासी विकास अशा विविध विभागांमध्ये ही नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील महत्त्वाच्या विभागांमध्ये काम करणाऱ्या 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामधील नियुक्त्या खालीलप्रमाणे आहेत:
त्रिगुण कुलकर्णी (IAS:SCS:२०१६): यांची इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या शिक्षण बोर्डाच्या (SSC आणि HSC बोर्ड, पुणे) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते यशदा, पुणे येथे उपमहासंचालक म्हणून कार्यरत होते.
प्रकाश खपले (IAS:SCS:२०१३): यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे. याआधी ते छत्रपती संभाजी नगर येथे मृदा आणि जलसंधारण आयुक्त म्हणून कार्यरत होते.
राहुल रंजन महिवाल (IAS:RR:२००५): यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे.
डॉ. मंजिरी मानोलकर (IAS:SCS:२०१६): ज्या यापूर्वी महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक होत्या, त्यांची आता आयुक्त, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
अंजली रमेश (IAS:RR:२०२०): हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या अंजली रमेश यांची आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.